Hero MotorCorp Logo Photo Credits: Wiki Commons

देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता हिरो इलेक्ट्रिक मोटर्स आणि ईवी मोटर्स इंडिया यांनी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार ईवी मोटर्स इंडिया हीरोच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि चार्जिंग इंफ्रोस्ट्रक्चर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत पुढील 12 महिन्यांमध्ये काही शहरांमध्ये 10,000 ई-बाईकच्या पायलट प्रोजेक्ट उतरवण्यात येणार आहेत. त्यानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

येथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे ईव्हीएम मोटर्सची बॅटरी हिरो इलेक्ट्रिकची बाईक आणि स्कूटरमध्ये लावली जाणार आहे. जी कंपनीच्या प्लगनेगो नावाच्या रॅपिड चार्जिंग स्टेशन नेटवर्कच्या माध्यमातून अवघ्या 30 मिनिटात कमी वेळात सुपरचार्ज केली जाणार आहे. हे स्टेशन सध्या भारतातील काही शहरात स्थापित केले जात आहेत. या बॅटरीसह येणारे ड्रायव्हिंग रेंज बद्दल बोलायचे झाल्यास ही सिंगल चार्जमध्ये 130 ते 140km चे अंतर कापणार आहे.(Citroen यांनी भारतात C5 Aircross SUV चे भारतात सुरु केले ट्रायल प्रोडक्शन)

रॅपिड चार्जिंग स्टेशन हिरो इलेक्ट्रिक डिलरशीपसह देशातील विविध भागात स्थापन केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक चार्जिंगची सुविधा सुद्धा सुलभ केली जाणार आहे. या विषयासंबंधित बातचीत करताना हिरो इलेक्ट्रिकचे सीई सोहिंदर गिल यांनी असे म्हटले की, 30 मिनिटांत चार्जिंग इलेक्ट्रिक वाहनांसाठी गेम चेंजर ठरु शकतो. गिल यांनी पुढे असे ही म्हटले की, एक मार्केट डिलरच्या रुपात आम्ही ग्राहकांना उत्तम इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करुन देतो.