Russian Helicopter Crashes: 22 जणांसह बेपत्ता झालेले रशियन हेलिकॉप्टर कोसळले; 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले
रशियन राज्य वृत्तसंस्था आरआयए नोवोस्टीने आपत्कालीन मंत्रालयाचा हवाला देत हेलिकॉप्टरवरील सर्वांचा मृत्यू झाल्याचा कयास लावला आहे.
Russian Helicopter Crashes: रशियाच्या पूर्वेला बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर (Helicopter) कोसळले असून यातील 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 22 जणांचा समावेश असणारे हे हेलिकॉप्टर बेपत्ता (Missing Russian Helicopter) झाले होते. यातील इतर सदस्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर ज्या ठिकाणाशी शेवटचा संपर्क साधला होता, त्या ठिकाणाजवळ 900 मीटर अंतरावर सापडले. रशियन राज्य वृत्तसंस्था आरआयए नोवोस्टीने आपत्कालीन मंत्रालयाचा हवाला देत हेलिकॉप्टरवरील सर्वांचा मृत्यू झाल्याचा कयास लावला आहे.
हेलिकॉप्टर खराब हवामानात खराब दृश्यमानतेमुळे क्रॅश झाले असावे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष शोधण्यासाठी मोहीम सुरू होती. दरम्यान, ज्या ठिकाणी शेवटचा संपर्क झाला होता त्या ठिकाणाजवळ 900 मीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. (हेही वाचा -Helicopter Crash Caught on Camera in Kedarnath: केदारनाथमध्ये लष्कराच्या MI-17 हेलिकॉप्टर कोसळले,अपघाताचा थरार व्हिडिओ व्हायरल)
एमआय-8 हेलिकॉप्टरने शनिवारी कामचटका प्रदेशातील वचकाझेट्स येथून उड्डाण केले. परंतु, नियोजित वेळेनुसार ते त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचले नाही, रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने यापूर्वी एका निवेदनात म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 19 प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते. Mi-8 हे 1960 च्या दशकात डिझाइन केलेले दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे. (हेही वाचा - Pune Helicopter Crash At Paud: पुणे येथील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले)
कामचटका प्रदेश आपत्कालीन मंत्री सर्गेई लेबेदेव यांनी सांगितले की, 'प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामवर सांगितले की, हवाई सर्वेक्षण करून बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष शोधण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी शेवटचा संपर्क झाला होता त्या ठिकाणाजवळ हे 900 मीटर अंतरावर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.'