OPPO कंपनीने त्यांचे ट्रुली वायरलेस इअरपोन सेगमेंटमध्ये नवे डिवाइसचा समावेश करत याच वर्षात भारतीय बाजारात Enco W11 लॉन्च केला होता. जो W31 पेक्षा स्वस्त असा वेरियंट आहे. हे डिवाईस भारतात ई-कॉमर्स वेबसाईट्स फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतात हे डिवाईस लॉन्च करुन अवघे दोनच महिने झाले असून कंपनीने त्याच्या किंमतीत घट सुद्धा केली आहे. युजर्स OPPO Enco W11 लॉन्चिंगच्या तुलनेत अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. दरम्यान याच्या किंमतीत किती घट झाली याबद्दल कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
OPPO Enco W11 भारतात 2499 रुपयांना लॉन्च करण्यात आले होते. परंतु ई-कॉमर्स बेवसाईट फ्लिपकार्टवर हे डिवाइस फक्त 1999 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परंतु या संदर्भात कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. फ्लिपकार्टवर युजर्सला OPPO Enco W11 सोबत काही आकर्षक ऑफर्स सुद्धा मिळणार आहेत. SBI क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. तर RuPay च्या डेबिट कार्ड मधून फर्स्ट ट्रान्जेक्शनवर 30 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकणार आहे.(OnePlus ने केली Red Cable Day ची घोषणा; आता दर महिन्याच्या 17 तारेखला मिळणार Exclusive Offers)
OPPO Enco W11 मध्ये 8mm ड्रायवर दिला आहे आणि हे डिवाइस AAC ऑडिओ फॉर्मेटसह येणार आहे. यामध्ये युजर्सला इंप्रेसिव फिचरच्या अंतर्गत कॉलिंगसाठी Noise कॅन्सिलेशन फिचरची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच कॉलिंगच्या वेळी तुम्हाला बाहेरील आवाजाची समस्या येणार नाही. कनेक्टिव्हिटी फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ब्लूटूथ 5.0 दिला असून जे अधिकतम 10 मीटर रेंज पर्यंत कनेक्टिव्हिटी सपोर्ट करु शकणार आहे. या व्यतिरिक्त OPPO Enco W11 इअरफोनमध्ये टच कंट्रोल सपोर्ट सुद्धा दिला असून जो डिवाइसच्या वापरासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतो.