Facebook वर चुकून सुद्धा करु नका 'हे' काम अन्यथा अकाउंट होईल ब्लॉक
फेसबुक (Photo Credits: ANI)

जगभरातील अर्ध्याहून अधिक लोक फेसबुक (Facebook)  सोबत जोडली गेली आहेत. तसेच दिवसभरात काही ना काही कोणतीरी फेसबुकवर शेअर करत असतात.मात्र काही गोष्टी अशा सुद्धा आहेत ज्या सोशल मीडियात कधीच शेअर करु नका. अन्यथा तुमचे फेसबुकचे अकाउंट किंवा अन्य सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक होईल. तर फेसबुकवर अनधिकृत पद्धतीने औषधांची विक्री ते ड्रग्ज विक्री करण्यावर बंदी आहे. त्याचसोबत दारु-गोळा, पिस्तुल यांची खरेदी किंवा विक्री सुद्धा फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरुन करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशातच जर तुम्ही या संदर्भातील काही गोष्टी शेअर किंवा पोस्ट केल्यास तुमचे फेसबुकचे अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते.

तसेच हिंसात्मक किंवा समाजात तेढ निर्माण होईल अशा गोष्टी संदर्भातील पोस्ट केल्यास तुमच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्याचसोबत फेसबुकसह ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही ती पोस्ट शेअर केली आहे तेथून सुद्धा तुम्हाला ब्लॉक केले जाण्याची अधिक शक्यता आहे. त्याचसोबत पैशांची मागणी करणे किंवा एखाद्या हत्याराबद्दल उल्लेख किंवा चित्रासह त्याच्या विक्रीची ऑफर करणे तुम्हाला महागात पडू शकते.(Ways To Protect Your Social Media Accounts From Hackers : आपल्या सोशल मिडिया अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ७ टिप्स चा वापर करा)

ऐवढेच नाही तर फेसबुकवरील एखाद्या व्यक्तीला विनाकारण Poke करत असाल तर ते थांबवा. कारण तुमच्या या अॅक्टिव्हिटीवर फेसबुकची नजर असून जर एखाद्या युजर्सने तुमच्या विरोधात तक्रार केल्यास तुम्हाला तुमचे अकाउंट कालांतराने ब्लॉक झाल्याचे दिसून येईल. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे दहशतवादासंबंधित एखादी पोस्ट किंवा त्याला प्रोत्साहन करणारी एखादी माहिती कधीच फेसबुकवर शेअर करु नका. तसेच एखाद्या राजकीय नेत्यासह किंवा लोकांसोबत कारणास्तव समर्थन दिल्याची पोस्ट तुम्ही जर फेसबुकवर पोस्ट करणार असाल तर सावध रहा. कारण या सर्व गोष्टी फेसबुक मान्य करत नाही. अशा गोष्टींच्या विरोधात फेसबुककडून कारवाई केली जाते.