शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना बीसीसीआयचा झटका; ए प्लस श्रेणीतून बाहेर
Shikhar Dhawan & Bhuvaneshwar Kumar (Photo Credit: File Photo)

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि फास्टर बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) यांना बीसीसीआयने (BCCI) जबरदस्त झटका दिला आहे. बीसीसीआयने त्या दोघांनाही ए प्लस श्रेणीतून (A+ category) बाहेर केले आहे. गुरुवारी (7 मार्च) रात्री बीसीसीआयने ही घोषणा केली. तर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांची ए प्लस श्रेणीतील जागा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतने पटकावली आहे.

बीसीसीआयनुसार आता केवळ तीन खेळाडू ए प्लस श्रेणीत आहेत. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि फास्टर बॉलर जसप्रीत बुमराह.

ए श्रेणीतील खेळाडू :

एमएस धोनी, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, इशान्त शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे.

बी श्रेणीतील खेळाडू:

चिनमान कुलदीप, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या, उमेश यादव, युजवेन्द्र चहल.

सी श्रेणीतील खेळाडू:

दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनिष पांडे. हनुमा विहारी, केदार जाधव, खलील अहमद, रहिमान साहा.