Lok Sabha Election 2024 Results: 'स्वतःला देव मानणाऱ्या PM Narendra Modi यांचे नाक कापले गेले'; लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया
हाती आलेले निकाल पाहता 2024 आणि 2019 च्या तुलनेत भाजपने निराशाजनक कामगिरी केली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. हाती आलेले निकाल पाहता 2024 आणि 2019 च्या तुलनेत भाजपने निराशाजनक कामगिरी केली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, ‘मोदींनी व्रत केले, ध्यान केले मात्र देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. मोदींना निरोप दिला आहे. भाजपने याधी 2014 आणि 2019 मध्ये एकट्याने बहुमत प्राप्त केले होते. मात्र आता 2024 मध्ये भाजपला बहुमत न मिळणे हा पीएम मोदी व अमित शाह यांचा पराभव आहे. इंडिया आघाडीने मेहनत घेऊन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा अहंकार उद्ध्वस्त केला आहे. आता मोदींचे सरकार बनणार नाही. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, कारण ते आणि भाजप हरले आहेत. स्वतःला देव मानणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी यांचे नाक कापले गेले आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्रात आम्ही मोदींना अडवले आहे.’ (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निकालात ठाकरेंच्या जागा आघाडीवर, सुषमा अंधारे यांचा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Mumbai | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "The people of the country have given farewell to Narendra Modi...BJP has not got a majority in 2024." pic.twitter.com/tMZoigGsbm
— ANI (@ANI) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

