Pakistani Troops Violate Ceasefire: जम्मूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने नापाक कृत्य केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या चौकीवर विनाकारण गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला आहे. याला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समधील हा गोळीबार 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालला. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये बीएसएफचा एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला होता.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याने 2003 च्या युद्धविराम कराराबद्दल वचनबद्धता दाखवून गोळीबार थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही पाकिस्तानने त्यानंतर अनेकवेळा भारतीय सैन्यावर गोळीबार केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)