12 आमदारांची नव्हेतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची काळजी करावी; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला
Devendra Fadnavis | (PTI)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात घुमाकूळ घातला असाताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करु नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी, कोरोनाबाधित रुग्णांची काळजी करावी, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील महापालिका आणि कोरोनाविषयक तयारीचा आढावा घेत आहेत. आज त्यांनी भिवंडी महानगरपालिकेतील कोरोनाचा आढावा घेतला आहे. दरम्यान, मुंबई उपनगरात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जर लवकरात लवकर व्यवस्था उभ्या केल्या नाही, तर लोकांना आणखी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल, अशी चिंताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करु नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. कोव्हिड रुग्णांची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

संजय राऊत काय म्हणाले होते?

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आताच सुरु झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी 105 आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून सरकार बनवले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांत या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय ? हाच प्रश्न आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखाच्या वर पोहचली आहे. यापैकी 8 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात केवळ मुंबई 82814 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.