Nitin Gadkari: नितीन गडकरी कार्यालयात धमकी प्रकरणी आरोपी जयेश पुजारी पोलिसांच्या ताब्यात
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) मुसक्या आवळल्या आहेत. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा असे या व्यक्तीचे नाव आहे. कर्नाटक पोलिसांनी जयेश पुजारी याला बेळगाव येथून अटक केली. त्यानंतर त्याचा ताबा मिळविण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले होते. या पथकाने पुजारी याचा ताबा घेऊन त्याला नागपूर येथे आणले आहे. आता त्याच्याकडे सखोल चौकशी केली जाणार आहे. नागपूर येथील ऑरेंज हॉस्पीटल नजिक असलेल्या नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुरध्वनी आला होता. नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी या दुरध्वनीद्वारे करण्यात आली होती. हा फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारी असे सांगितले होते.

जयेश पुजारी हा बेळगा कारागृहातील आरोपी आहे. कारागृहात असतानाच जयेश पुजारी याने धमकीचा फोन कसा काय केला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. येश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने दोन वेळा फोन आल्याने पोलिसही सतर्क झाले होते. त्यामुळे फोन करणारा व्यक्ती जयेश पुजारी हाच आहे की त्याच्या नावाने इतरच कोणीतरी खोडसाळपणा करत आहे? याबाबतचे सत्य पुढे आणने पोलिसांसमोरील आव्हान होते. दरम्यान, पोलिसांनी आता पुजारी याला ताब्यात घेतल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. (हेही वाचा, Nitin Gadkari Threat Call Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरु येथून एक तरुणी पोलिसांच्या ताब्यात )

नितीन गडकरी यांच्या कार्यालायत 21 मार्च रोजी दोन वेळा दुरध्वीनी आले होते. यातील पहिला दुरध्वनी सकाळी 10.55 वाजता आला होता. तर दुसरा दुरध्वनी 11 आणि 11.55 वाजता आला. पहिल्यादा सकळी आलेल्या फोनवर कोणतेही बोलणे झाले नाही. पण दुसऱ्या दोन फोनमध्ये आोरपीने समोरुन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, 10 लाख रुपयांची मागणीही केली. पोलिसांनी केलेल्या तपासात ज्या मोबाईलवरुन धमकीचा फोन आला तो मोबाईल क्रमांक मंगळूर येथील एका मुलीचा आहे. ही मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. आता आरोपीला अटक झाल्याने अनेक बाबींचा उलघडा होणार आहे.