Mumbai Local Train Chaos: नियमित ट्रेन रद्द, डोंबिवलीमध्ये संतप्त प्रवाशांचा जबरदस्तीने एसी लोकलमध्ये प्रवेश; मुंब्रा दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही गोंधळ

मुंब्राजवळ गर्दीमुळे चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर, डोंबिवली स्थानकात गोंधळ माजला कारण प्रवाशांनी बळजबरीने एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवेश केला. आरपीएफने जमावाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Mumbai Local Train Chaos: नियमित ट्रेन रद्द, डोंबिवलीमध्ये संतप्त प्रवाशांचा जबरदस्तीने एसी लोकलमध्ये प्रवेश; मुंब्रा दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही गोंधळ
AC Local Train Video | (Photo Credit- X)

Dombivli AC Local Overcrowding: मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train News) रद्द झाल्याने डोंबिवली येथील प्रवासी संतापले आणि त्यांनी थेट वातानुकुलीत रेल्वे गाड्यांमध्ये जबरदस्तीने प्रवेश (Mumbra Train Tragedy) केला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ एसी लोकलने (AC Local Train Video) प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी (Mumbai Commuter Struggles) सोशल मीडियावर सामायिक करत नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी (10 जून) सकाळी एक नियमित ट्रेन अचानक रद्द (Train Cancellation Chaos) करण्यात आल्यानंतर हा गोंधळ उडाला, ज्यामुळे हजारो दैनंदिन प्रवासी अडकले आणि हताश झाले. अखेर त्यांनी एसी लोकलमध्ये चढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मुंबई लोकल ट्रेन आणि गर्दी हे समिकरण नवे नाही. हे समिकरण अनेकदा अपघातास कारण ठरुन अनेकांचे प्राण सातत्याने जात आले आहेत. अगदी काल (9 जून) सुद्धा मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्टेशन जवळ अशीच घटना घडली. ज्यामध्ये चार प्रवाशांचे प्राण हाकनाक केले तर काही जखमी झाले. या अपघातानंतर सलग दुसऱ्या दिवशी देखील फलाटांवर गोंधळ पाहायला मिळत आहे.

प्रवाशांच्या गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे जाम

प्रवासी खालिद चौगल (@ChougleKhalid) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सकाळी 9.30 वाजता डोंबिवली स्थानकावर प्रवाशांचा मोठा जमाव जबरदस्तीने एसी लोकलमध्ये चढताना दिसत आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वेचे दरवाजे बंद होऊ शकले नाहीत तर रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कर्मचारी हे गोंधळलेले दृश्य हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, "जास्त गर्दीमुळे मुंबई लोकलमध्ये झालेल्या चार मृत्यूंनंतर, आज सकाळी 9.30 वाजता, डोंबिवली येथे नियमित ट्रेन रद्द झाल्यानंतर प्रवाशांमध्ये जबरदस्तीने एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवेश केला." (हेही वाचा, Pune Railway Division: मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे विभागाचा धक्कादायक अहवाल; 18 महिन्यांत 158 प्रवासी गाडीतून पडले, 49 जणांचा मृत्यू)

नियमित ट्रेन रद्द केल्याने गोंधळ

नियमीत प्रवासी आपल्या भावना व्यक्त करताना सांगतात की, गर्दीच्या वेळी नियमित लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि नंतर त्यांनी पुढील एसी ट्रेनमध्ये चढण्यासाठी धाव घेतली - ती आधीच पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही. मर्यादित पर्याय आणि अधिकाऱ्यांकडून स्पष्ट संवाद नसताना, लोक डब्यांमध्ये ढकलताना दिसले, ज्यामुळे त्यांना दुखापत होण्याचा धोका होता.

दरम्यान, हा व्हिडिओ मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या गंभीर स्थितीवर प्रकाश टाकतो, जिथे गर्दी आणि सेवा विस्कळीत होणे हे लाखो प्रवाशांसाठी दररोजचे आव्हान बनले आहे.

मुंब्रा दुर्घटनेमुळे लोकांच्या मनात भीती

मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी झालेल्या एका दुःखद अपघाताच्या एक दिवसानंतर संतप्त प्रवाशांनी एसी ट्रेनमध्ये प्रवेश करण्याची घटना घडली. या घटनेनंतर अनेक प्रवाशांनी मुंब्रा दुर्घटनेबद्दल भीती व्यक्त केली. ज्यामध्ये कसारा ते सीएसएमटी या जलद लोकल ट्रेनमधून चार प्रवासी पडून मृत्युमुखी पडले. अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या प्राथमिक निष्कर्षांमध्ये अतिरेकी गर्दी हे त्याचे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे.

रेल्वे जबाबदारी आणि मनसेचे आंदोलन

मुंब्रा दुर्घटनेतील मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी ठाण्यात निषेध रॅली काढली. मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली, शेकडो कार्यकर्त्यांनी गावदेवी ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढला आणि तातडीने सुधारणा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या चांगल्या उपाययोजनांची मागणी केली.

निदर्शकांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा निषेध केला आणि "रोजचे मृत्यू, जबाबदार कोण?", "प्रशासन सुन्न आहे, सरकार आंधळे आहे," आणि "मृतांना न्याय द्या, दोषींना शिक्षा द्या" असे संदेश लिहिलेले फलक हातात घेतले.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाढत्या मागण्या

रेल्वे अपघातांच्या सलग घटनांमुळे जनतेचा रोष वाढला आहे आणि मुंबईतील वाढत चाललेल्या प्रवाशांच्या संकटाला तोंड देण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आहे. प्रवाशांनी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेची चांगली वारंवारता, लांब रेक, वेळेवर संवाद आणि सेवा व्यत्यय दरम्यान धोरणात्मक व्यवस्थापनाची मागणी पुन्हा केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2025 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).