Varsha Gaikwad (Photo Credit: Twitter)

Maharashtra To Promote Students Of Classes 1 To 8 Without Exams: महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे जाळे (Coronavirus) अत्यंत वेगाने पसरताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी  माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

"राज्यातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना संकटाच्या काळात ऑनलाईन पद्धतीच्या माध्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. या काळात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करणे शक्य झाले नाही. दरम्यान, पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी शाळा सुरु करण्यात आली, तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे. मात्र, यावर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे", असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- COVID-19 Hospital Bed Availability in Mumbai, Thane and Navi Mumbai: मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील कोविड 19 रुग्णालयातील बेड्स उपलब्धता पाहण्यासाठी हा डॅशबोर्ड पाहा, जाणून घ्या शहरातील आयसीयू आणि एकूण खांटांबाबत

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात आज 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 24 लाख 57 हजार 494 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 3 लाख 89 हजार 832 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.