Sanjay Raut: 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी

हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. संजय राऊत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

Sanjay Raut: 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा', संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट (Tweet) करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे. संजय राऊत म्हणाले की, बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे 27 मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ 2 जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. संजय राऊत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा फोटोही शेअर केला आहे. राज्य घटनेनुसार चालत आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी राज्यपालांना केला

राज्यपाल हे काय सुरु आहे?

या केलेल्या ट्विटपूर्वी संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी घटनेच्या कलम 164-1A चा हवाला देत राज्य मंत्रिमंडळात 12 मंत्री असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यापेक्षा कमी संख्या असेल, तर संविधान त्या मंत्रिमंडळाला मान्यता देत नाही. गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांनी (शिंदे-फडणवीस) घेतलेल्या निर्णयांची घटनात्मक वैधता नाही, असे संजय राऊत म्हणतात. राज्यपाल हे काय सुरु आहे?

राऊत यांना राज्यघटना कळते का? गजनी पिक्चर बघायला जा - आशिष शेलार

संजय राऊत यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत की, 'संजय राऊत यांना संविधान कळते का? ते चित्रपट निर्माता आहे. गजनी पिक्चर बघायला जा. कारण त्यांना विसरण्याची बिमारी आहे. महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 32 दिवस झाले होते तरी झाला नव्हता. तोपर्यंत केवळ 7 मंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्द व्हायला हवे होते. कारण त्यावेळी 12 मंत्रीही मंत्रिमंडळात नव्हते.'' (हे देखील वाचा: Shivsena: बदलापुरमधील 25 नगरसेवकांचा शिंदे गटाला पांठिबा, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिकांचाही समावेश)

आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना 16 दिवस उलटले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्न उपस्थित करत असल्याची आठवण करून दिली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन बत्तीस दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसताना त्यांनी हा प्रश्न का उपस्थित केला नाही? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2022 11:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).