Sambhaji Bhide: कोरोना व्हायरस संसर्गामुळे मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे
Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नावाचा आजारच नाही. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. मास्क (Mask) लावण्याचा सिद्धांत कोणत्या शाहण्याने काढला आहे. चावटपणा आहे सगळा. मूर्खपणा आहे, असे काहीसे अजब तर्कट मांडत संभाजी भीडे (Sambhaji Bhide) यांनी वादग्रस्त विधानस केले आहे. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठानचे (Shivpratishthan ) संस्थापक आहेत. संभाजी भिडे यांनी या आधीही अशीच काही वादग्रस्त विधाने केली आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे हे नेहमी चर्चेत असतात. या ही वेळी त्यांनी कोरोना हा रोगच नाही असे विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाचे कारण देऊन लॉकडाऊन लावला जात आहे. खरे म्हणजे लॉकडाऊन लावण्याची काहीही गरज नाही. लोकांचे पोट हातावर आहे. अशा लोकांचे नुकसान होत आहे. दारुची दुकाने उघडली जात आहेत. इतर गोष्टी बंद केल्या जात आहे. दारुच्या दुकानावर जाणाऱ्यांना पोलीस काही बोलत नाही. इतर वेळी मात्र काठी मारतात. ज्याला त्याला आपापल्या आरोग्याची काळजी आहे. सरकारने यात पडू नये. उगाच लॉकडाऊन लावून नये, असे संभाजी भिडे म्हणाले.

कोरोना कोरोना आहे असे म्हणत म्हणत सगळी प्रजा बावळट आणि भंपक होत जालली आहे. ज्याला आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे तो घेईल. सरकारने यात अजिबाद लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शी कारभार घ्यावा. लॉकडाऊन लागू करु नये. एका बाजूला गांजा, मटका, दारु, मावा अफू सगळे सुरु आहे. दुसऱ्या बाजूला मात्र, तालमी, मैदाने बंद अशी स्थिती आहे. हा सगळा काय चावटपणा चालवला आहे? असेही भिडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Video: वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते; संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्र महिला आयोग दखल घेणार का?)

देशात कोरोनाच्या नावाखाली खेळखंडबोबा सुरु आहे. हा खेळखंडोबा देश आणि राज्य अशा दोन्ही पातळीवर सुरु आहे. याला केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारे जबाबदार आहेत. ज्यांना जगायचे ते जगतील, ज्यांना मरायचे ते मरतील. हे राज्य छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांना आदर्श मानून केले जावे. नोटेवरचा गांधी डोळ्यासमोर ठेऊन जर कारभार केला तर कोरोना हा असाच वाढेल, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.