मुंबई (Mumbai) मध्ये मुलुंडच्या नाणेपाडा (Nanepada) परिसरामध्ये एका इमारतीमध्ये घरात स्लॅबचा एक भाग कोसळून 2 वृद्ध नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही इमारत मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र तरीही काही कुटुंब या इमारतीमध्ये राहत होते. दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या वृद्ध जोडप्याचं नाव देवशंकर शुक्ला (93) आणि आरखी शुक्ला (87) आहे.
सोमवार 15 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली आहे. दरम्यान दुर्घटनेचं वृत्त समजताच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि बीएमसी कर्मचार्यांकडून बचावकार्य करण्यात आले यामध्ये अनेकांना सुखरूप देखील बाहेर काढण्यात यश आलं आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करून नागरिकांनी बीएमसीने 'धोकादायक' म्हणून जाहीर केलेल्या इमारतींमध्ये राहू नये असे पुन्हा आवाहन केले आहे. हे देखील नक्की वाचा: Thane Building Collapse: ठाणे शहरातील डायघर परिसरात 5 मजली इमारतीचा भाग कोसळला; सुदैवाने जिवितहानी नाही.
आदित्य ठाकरेंचं आवाहन
The unfortunate death of two senior citizens in a ceiling collapse at Nane Pada, Mulund (E) is extremely saddening. May their soul rest in peace.
While rescue operations are on, I, once again urge citizens to not turn a deaf ear to dilapidated structure warnings of @mybmc
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 15, 2022
पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी इमारत कोसळण्याच्या घटना समोर येतात. जून महिन्यात मुंबईत कुर्ला परिसरामध्येही एक इमारत कोसळून काहींना आपला जीव गमवावा लागला होता. 20-25 वर्ष जुन्या इमारतींचा आढावा घेऊन पालिकेकडून 'धोकादायक इमारती'ची यादी प्रसिद्ध केली जाते. पण अनेकदा नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. वेळेत इमारत रिकामी करत नाही आणि आपला जीव गमावून बसतात.