महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: राज्यातील 9 लाख महिला 'लाडकी बहिण योजने'साठी अपात्र; इथूनपुढे मिळणार नाहीत 1,500 रुपये

Prashant Joshi

आर्थिक निकषांच्या आधारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आता त्यात आणखी 4 लाख महिलांचा समावेश होणार आहे. यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे.

Amit Shah Pune Visit: उद्या गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर; शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उद्या (22 फेब्रुवारी) पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विभागीय परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Vada Pav To Become Costlier? मुंबईमधील रेस्टॉरंट्स, ढाबे आणि बेकरींना हरित इंधनाचा वापर करण्याचे BMC चे आदेश; 'वडापाव' सारख्या स्ट्रीट फूड्सच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Prashant Joshi

मुंबई बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष (दक्षिण मुंबई) अशफाक सिद्दीक यांच्यानुसार, स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक केल्याने, सहा पावची किंमत 12 रुपयांवरून 60 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पाव तयार करण्यासाठी सध्याच्या ओव्हनमध्ये डिझेल आणि लाकडाचा वापर केला जात आहे. जर त्याऐवजी विजेचा वापर केल्यास उत्पादनाचा मूळ खर्च वाढेल.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोठी भेट, राज्यात मुली आणि बहिणींना रेशन कार्डवर मोफत मिळणार साड्या

Shreya Varke

सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पात्र रेशन कार्डधारक बहिणींना दुकानात धान्यासह मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे. या साड्या उत्सवाच्या दिवशी वाटल्या जातील. हा उपक्रम वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविला जाईल. याचा फायदा पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार ८७४ रेशनकार्डधारकांना म्हणजेच महिलांना होईल.

Advertisement

98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु; PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

टीम लेटेस्टली

या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन, आणि विकास करणे आहे. दरवर्षी, हे संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाते, ज्यामुळे विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि वाचकांना एकत्र येण्याची संधी मिळते.

Nashik Shocker: नाशिक शहर हादरलं! नवले कॉलनीत 24 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निघृण हत्या

Bhakti Aghav

नाशिकरोडजवळील नवले कॉलनी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अजय भंडारी असे मृताचे नाव असून रात्री उशिरा त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

Nurse Strike In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर सरकारी रुग्णालयातील परिचारिका एक दिवसाच्या संपावर

Bhakti Aghav

संपावर असलेल्या परिचारिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयांमधील सामान्य कामकाज प्रभावित झाल्याचा दावा केला, तर वैद्यकीय सुविधांमधील अधिकाऱ्यांनी निषेधाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगितले.

Manikrao Kokate Gets Two Years Jail: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा; जामीनही मिळाला

Prashant Joshi

सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या 30 वर्षे जुन्या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यायालयाने गुरुवारी, राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi: पुणे जिल्ह्यातील 'तुळापूर' आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ, तर वढू बुद्रुक समाधीस्थळ; जाणून घ्या या दोन्ही ठिकाणांबद्दल

Prashant Joshi

औरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 9 वर्षे महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. त्यांच्या बलिदानामुळे ते खरे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडून तुळापूर येथे आणले होते, या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले.

Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देऊ; पोलिसांना मिळाला धमकीचा मेल, तपास सुरु

Prashant Joshi

या धमकीनंतर शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.

Mahakumbh Fake Helicopter Ride Scam: प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 'हेलिकॉप्टर राईड' देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; तयार केली बनावट वेबसाईट, 5 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक

Prashant Joshi

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते.

Apollo Cancer Centre मध्ये TiLoop Reconstruction सह महाराष्ट्रातील पहिली Robotic Nipple-Sparing Mastectomy शस्त्रक्रिया यशस्वी

Bhakti Aghav

नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर ने महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निपल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी (आरएनएसएम) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Advertisement

Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा (Video)

Prashant Joshi

सोमवारपासून महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग सुरु झाले असून, ते रविवारपर्यंत चालणार आहे. एका महिलेला एक तिकीट देण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येक महिलेच्या मनात देशप्रेमाची, धर्मप्रेमाची भावना निर्माण होईल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

Pod Car System In Mira-Bhayandar: लवकरच मीरा-भाईंदरमध्ये सुरु होऊ शकते ड्रायव्हरलेस 'पॉड कार' सेवा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik प्रयत्नशील

Prashant Joshi

सरनाईक यांनी ही उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून, भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असेही त्यांनी सांगितले.

Dance Bars In Mumbai: मुंबईमध्ये पुन्हा सुरु होऊ शकतात डान्स बार; महाराष्ट्र सरकार करणार कायद्यात सुधारणा, येत्या अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

अनेक निदर्शने आणि कायदेशीर वादविवादानंतर, राज्य सरकार डान्स बारविरुद्धची बंदी उठवण्यासाठी एक विधेयक तयार करत आहे. महायुती सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा मसुदा विधेयक सादर करण्यात आला होता, परंतु त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्याने तो पुढे ढकलण्यात आला.

Bee Attack in Pune: शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; शिवजयंतीनिमित्त आलेले 10 जण जखमी, 7 वैद्यकीय कर्मचारी आणि वन अधिकाऱ्याचा समावेश

Jyoti Kadam

पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या टोळीने हल्ला केला आहे. 10 जणांवर मधमाश्यांच्या झुंडीने हल्ला केला. त्यात कर्तव्यावर असलेले सात वैद्यकीय कर्मचारी, वन अधिकारी आणि तीन पर्यटक जखमी झाले.

Advertisement

Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू

Prashant Joshi

फेज 2 अंतर्गत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग अशा नवीन मार्गिकांचा समावेश आहे. अशाप्रकारे पुणे मेट्रो शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून, पर्यावरण संरक्षणात योगदान देऊन, आणि नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

Mira Road Accident: सोसायटीत एन्ट्री नाकारली, मद्यधुंद चालकाकडून 8 जणांना कारने चिरडण्याचा प्रयत्न; मीरा रोडमध्ये गुंडागर्दीचा थरार

Jyoti Kadam

मीरा रोडच्या विनय नगर येथील जेपी नार्थ बार्सिलोना बिल्डिंग सोसायटीत रविवारी सकाळी साडे सहा वाजता गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Washim: 7-8 फूट खोल नाल्यात पडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाशिम येथील घटना

Shreya Varke

मोहम्मद अरजान नावाच्या 3 वर्षाच्या मुलाचा 7 ते 8 फूट खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाशिम येथे घडली आहे. कारंजा शहरात घाण पाण्याने भरलेल्या खड्ड्यात हा मुलगा पडला होता. मंगळवारी, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून तो बेपत्ता होता. शोध घेतल्यानंतर सायंकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह सापडला.

'किल्ले रायगडावर जातोय', Shiv Jayanti निमित्त Chhaava स्टार Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”

Jyoti Kadam

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जात आहेत.

Advertisement
Advertisement