Maharashtra New Chief Secretary: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती

सामान्य प्रशासन विभागाच्या एसीएस (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ते अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) या पदावर कायम राहतील.

Rajesh Kumar (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra New Chief Secretary: राज्य सरकारने सोमवारी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार (Rajesh Kumar) यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती (Maharashtra New Chief Secretary) केली. सोमवारी निवृत्त सुजाता सौनिक यांच्याकडून कुमार यांनी पदभार स्वीकारला. सामान्य प्रशासन विभागाच्या एसीएस (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ते अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) या पदावर कायम राहतील. राजेश कुमार हे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे सीईओ आणि धाराशिव आणि जळगाव जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते 2020 पासून अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत.

महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement