First Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असतात 'या' गोष्टी; हळुवार सुरुवात करा आणि अनुभवा Memorable Moment
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit Instagram)

लग्न (Marriage)... दोन जीवांचे, शरीराचे मिलन. लग्नानंतर जेव्हा पती पत्नी एकत्र राहायला सुरुवात करतात, तेव्हा हळू हळू एकमेकांची सवय होत जाते. त्यानंतर आतुरता, ओढ, प्रेम अशा गोष्टी नात्यात येतात. मात्र हे सर्व सुरळीत जाण्यासाठी महत्वाचे असतात तुमचे शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स (Sex). मुख्यत्वे ठरवून केलेल्या लग्नात स्त्री-पुरुषांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो, अशावेळी तुम्हाला पार्टनरसोबतचा सेक्स किती हवाहाव्सा वाटतो त्यावर नात्यातील रस अवलंबून असतो. मात्र ही गोष्ट अवलंबून असते ती लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीवर. लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही पार्टनरला जितके आपलेसे करता तितके तुमच्या नाते घट्ट होत जाते. म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रीला नक्की काय हवे असते याबाबत आम्ही सांगत आहोत.

> भावनिक जवळीक – मुलगी आपला परिवार, आपले कुटुंब सोडून नव्या घरी आलेली असते. त्यामुळे ती नव्या घरी एकटी पडू नये याची काळजी नवऱ्याने घेणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्याच रात्री तुम्ही तुमच्या पार्टनरला भावनिक जवळीक द्या, सेक्सपेक्षाही तिला या गोष्टीची जास्त गरज असते.

> घाई करू नका – जे तुम्हाला आनंदाने मिळणार असते, ते ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रणय हा आयुष्यभर करायचा आहे, मात्र त्यावेळी ‘तो’ क्षण महत्वाचा आहे. यामुळे लग्नाच्या रात्री अजिबात घाई करू नका. सर्वात आधी आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, नव्या आयुष्याच्या स्वप्नांचे इमले रचा, तिला आश्वस्त करा की तुम्ही तिच्यासोबत नेहमी असणार आहात.

> कौतुक – नव्या घरी, नव्या घरातील लोक आपल्याला स्वीकारतील का? ही भीती प्रत्येक मुलीच्या मनात असते. त्यामुळे पहिल्या रात्री तुम्ही तुमच्या पार्टनरचे कौतुक करा, ती किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवून द्या. यामुळे मुलीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊन तीसुद्धा तुम्हाला आपलेसे करेल.

> मैत्री – आजकाल पुरुषांनी स्त्रियांवर सत्ता गाजवण्याचा काळ गेला आहे. त्यामुळे नात्यात पती पत्नीच्या अधिकाराऐवजी दोन मित्रांमधील प्रेम हवे. नव्या घरी आपल्या नवऱ्याच्या रूपाने आपल्याला मित्र मिळेल ही मुलींची अपेक्षा असते, त्यामुळे तुम्हीही त्यांना एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्याशी बोला, गप्पा मारा, त्यांच्या जीवनाविषयी माहिती करून घ्या. तिच्या इच्छाअ, आकांक्षा जाणून घ्या, सेक्सबाबतची तिची मते विचारा. (हेही वाचा: Passionate Sex: सेक्समधील 'तसल्या' गोष्टी स्त्रियांनाही आवडतात, मात्र लाजेमुळे बोलून दाखवत नाहीत; पुरुषांनो घ्या जाणून व पार्टनरला द्या परमोच्च सुख)

> हलका फोरप्ले – त्यानंतर जर का तुमचा जोडीदार तयार असेल तरच पुढे जा. लग्नाच्या पहिल्या रात्री प्रत्येक पुरुषाला संभोग करायची इच्छा असते, मात्र त्याआधी तुमच्या जोडीदाराची परवानगी घ्या. यासाठी तिला लाडिकपणे जवळ घेऊन, तिच्या शरीराला स्पर्श करा. लक्षात घ्या स्त्रियांना विविध ठिकाणी केलेले हळुवार स्पर्श फार आवडतात. त्यानंतर, किस करून फोरप्लेला सुरुवात करू शकता. इथे तुमच्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारचा फोर्स करणे टाळा. उलट तुम्हीच तिला फोरप्लेने खुश ठेवायचा प्रयत्न करा.

अशा काही सर्वसामान्य गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना लग्नाच्या पहिल्या रात्री हव्या असतात. यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादे गिफ्ट देऊन, ड्रेस देऊन अथवा फुले देऊन अजून खुश करू शकता.