राशीभविष्य 24 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Zodiac (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

24  सप्टेंबर 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष:  मेष राशीतील व्यक्तींना आज तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला  पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा.

शुभ उपाय- घरातून निघताना साखर खाऊन निघा

शुभ दान- गरजू व्यक्तींना अन्नदान करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- पिवळा

वृषभ: मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील.

शुभ उपाय- देवाचे नामस्मरण करा

शुभ दान- लाल वस्र दान करा

शुभ अंक- 8

शुभ रंग- हिरवा

मिथुन: आजच्या दिवशी मिथुन राशीतील व्यक्तींनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

कर्क: नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

सिंह: कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळ

कन्या: अतिउत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

तुळ: ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

strong>वृश्चिक:समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

धनु:आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. परंतु कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल.

शुभ उपाय-सूर्याला नमस्कार करुन त्याचा जप करा

शुभ दान- गाईला चारा द्या

शुभ अंक-9

शुभ रंग-पांढरा

मकर: नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आज जर तुमचा वाढदिवस असल्यास तुम्हाला नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

कुंभ: पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

मीन: जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी