17 सप्टेंबर 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष: घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.
शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा
शुभ दान- गरजूंना मदत करा
शुभ अंक- 6
शुभ रंग- लाल
वृषभ: तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा
शुभ दान- अंथरुण दान करा
शुभ अंक- 3
शुभ रंग- पिवळा
मिथुन: प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा
शुभ दान- भिक्षुकाला दान करा
शुभ अंक- 3
शुभ रंग- पांढरा
कर्क: मच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करताना घाई करू नका.
शुभ उपाय- हिरव्या रंगाच्या बुटांचा वापर करा
शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा
शुभ अंक- 7
शुभ रंग- हिरवा
सिंह: दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
शुभ उपाय- निळकंठाची पूजा करा
शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या
शुभ अंक- 5
शुभ रंग- पोपटी
कन्या: मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.
शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या
शुभ दान- जेवण दान करा
शुभ अंक- 4
शुभ रंग- केशरी
तुळ: नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- आकाशी
वृश्चिक: चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या
शुभ दान- जेवण दान करा
शुभ अंक- 4
शुभ रंग- केशरी
धनु: तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा
शुभ दान- रक्तदान करा
शुभ अंक-5
शुभ रंग-करडा
मकर: आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.
शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पोपटी
कुंभ: मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.
शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.
शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- जांभळा
मीन: आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.
शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.
शुभ दान- रक्तदान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- गुलाबी