LPG Price Hike: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ, घरगुती मात्र स्थिर; घ्या जाणून
ऑगस्ट महिन्याची सुरुवात आजपासून (1 ऑगस्ट) झाली आहे आणि आजपासून तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती 8.50 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची (Domestic LPG) किंमत कायम आहे. व्यावसायिक सिलिंडर 19 किलो वजनाचे असतात.
LPG गॅस सिलिंडर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. देशातील बहुतेक नागरिकांचे पोट त्यावर अवलंबून. त्यामुळे त्याच्या किमतींबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. शिवाय त्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा महागाईवर थेट परिणाम. असाच परिणाम आजपासून होणार आहे. या वर्षातील ऑगस्ट महिन्याची सुरुवात आजपासून (1 ऑगस्ट) झाली आहे आणि आजपासून तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती 8.50 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची (Domestic LPG) किंमत कायम आहे. व्यावसायिक सिलिंडर 19 किलो वजनाचे असतात.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 1652.50 रुपये आहे, जी 1646 रुपयांवरून - 6.50 रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये, किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे किंमत 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईत नवीन किंमत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये आहे. (हेही वाचा, Key Changes Effective from August 1: नवीन FASTag नियम, HDFC क्रेडिट कार्ड पुनरावृत्ती आणि Ola Electric IPO, यांसह बरंच काही, 1 ऑगस्ट पासून)
देशातील प्रमुख शहरांतील एलपीजी किंमत
दिल्ली-
नवी किंमत: 1652.50
जुनी किंमत- 1646
मुंबई
नवी किंमत- 1605
जुनी किंमत- 1598
कोलकाता
नवी किंमत- 1764.50
जुनी किंमत- 1756
चेन्नई
नवी किंमत- 1817
जुनी किंमत- 1809.5
ही अलीकडील किंमत वाढ 1 जुलै 2024 रोजी आधीच्या समायोजनानंतर आहे, जेव्हा 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नुकतीच दरवाढ करण्यात आली आहे.
विनाअनुदानित 14.2 किलो LPG सिलिंडरची किंमत कायम आहे. दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. उल्लेखनीय म्हणजे, 1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी तेल कंपन्यांनी 200 रुपयांची लक्षणीय कपात जाहीर केली, ज्यामुळे किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आली. त्यानंतर 9 मार्च रोजी , 2024, त्याच्या किंमतीत आणखी 100 रुपयांची कपात झाली.
दरम्यान, या दरवाडीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने विविध वस्तू, सेवांच्या किमती कमी केल्या. मात्र, आता निवडणुका संपल्या सरकार स्थिर झाले. त्यामुळे आता त्यांना जनतेचे काहीही पडले नाही. परिणामी हवे तेव्हा हवे तसे वाट्टेल तेवढ्या किमती वाढविण्याचे उद्योग सुरु आहेत. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी काहीतरी परयत्न करायला हवेत, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2024 09:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

