Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे मार्च-एप्रिल हप्त्याची मोठी अपडेट; महिलांच्या खात्यात 3000 रुपये एकत्र येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत हप्त्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडलेला हा निधी लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे मार्च-एप्रिल हप्त्याची मोठी अपडेट; महिलांच्या खात्यात 3000 रुपये एकत्र येणार?
Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांमुळे चर्चेत आहे. मे महिना उजाडला तरी अनेक पात्र महिलांच्या खात्यात अद्याप मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेची अंतिम मुदत संपल्यानंतर, सरकार आता प्रलंबित निधी वितरीत करण्याच्या तयारीत आहे.

हप्ता रखडण्याचे मुख्य कारण: ई-केवायसी आणि पडताळणी

योजनेचा हप्ता लांबणीवर पडण्यामागे प्रामुख्याने ई-केवायसी प्रक्रिया हे मोठे कारण आहे. ३० एप्रिल २०२६ पर्यंत सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे लाभ तात्पुरते थांबवण्यात आले होते. तसेच, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी करण्यात आलेल्या छाननीमुळेही निधी वितरणास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, राज्यातील सुमारे १.७५ कोटींहून अधिक महिला आता या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत.

३००० की ४५००? किती रक्कम जमा होणार?

सध्या सोशल मीडिया आणि लाभार्थी महिलांमध्ये खात्यात नक्की किती रक्कम येणार, यावरून चर्चा रंगली आहे.

दोन महिन्यांचा हप्ता: मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळाल्यास महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील.

तीन महिन्यांचा हप्ता: जर मे महिन्याचा हप्ताही यात समाविष्ट केला, तर ही रक्कम ४५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सरकारी निर्णय: सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बहुधा सरकार मार्च आणि एप्रिलचे प्रलंबित ३००० रुपये तातडीने देण्यावर भर देईल.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १० मे २०२६ पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात हा निधी 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) द्वारे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तांत्रिक अडथळे दूर झाले असून बँकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल.

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2026 11:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).