Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

मिझोराम येथे पुन्हा भूकंपाचे धक्के; 3.2 ताव्रतेची नोंद; 23 जून 2020च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Jun 24, 2020 12:06 AM IST
A+
A-
24 Jun, 00:05 (IST)

मिझोराम येथे पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

23 Jun, 22:48 (IST)

पुण्यात गेल्या 24 तासात 820 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची व 13 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण संक्रमितांची संख्या 16851 झाली आहे. आतापर्यंत एकूण 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

23 Jun, 22:43 (IST)

मुंबईत आज 846 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे शहरात एकूण संक्रमितांची संख्या 68,481 झाली आहे. यामध्ये 34,576 बरे झालेले रुग्ण, 30,063 सक्रीय रुग्ण आणि 3,842 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

23 Jun, 21:51 (IST)

मेक्सिकोच्या दक्षिणेकडील राज्य ओक्सासा येथे मोठा भूंकप झाला आहे. भूकंप मापन यंत्रावर 7.4 तीव्रतेची नोंद झाली आहे. एएनआयचे ट्विट-

 

23 Jun, 21:28 (IST)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज 3 हजार 214 रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 39 हजार 10 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

23 Jun, 20:57 (IST)

राजस्थानमध्ये आज 395 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजाराच्यावर पोहोचला आहे. 

 

23 Jun, 20:47 (IST)

उत्तर प्रदेशमध्ये 576 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

23 Jun, 20:18 (IST)

गोव्यात आज 45 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 909 इतकी झाली आहे.

 

23 Jun, 19:53 (IST)

धारावीत आज 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 2189 वर पोहोचली आहे.

 

23 Jun, 19:01 (IST)

महाराष्ट्रातील अकोल्या जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अकोल्याच्या दक्षिणेस 129 किमी अंतरावर साडेपाचच्या सुमारास हा भूंकपाचा धक्का बसला.

 

Load More

मुंबईमध्ये आज (23 जून) मानखुर्द भागात एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड दरम्यान असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला ही आग लागली असून 4 अग्निशमनाच्या गाड्या तेथे पोहचल्या आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आज कोरोनाच्या विळख्यातही ओडिशा येथील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात झाली आहे. भाविकांना घरबसल्या या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी टेलिव्हिजनवर दूरदर्शनवर थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. चार धामांपैकी एक पुरी चा समावेश असल्याने भाविकांमध्ये त्याची विशेष ओढ आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्याम मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आता 'मिशन झिरो' हातात घेण्यात आलं आहे. यामध्ये मुंबईच्या उपनगरांत उत्तर दिशेला फैलावणारा कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.


Show Full Article Share Now