रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 535 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 11 जण दगावल्याची आरोग्य विभागाची माहिती ; 20 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Aug 20, 2020 11:53 PM IST
कोरोना व्हायरसवर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे निर्माण होणारी बिकट परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे मोठे आव्हान आहे. परंतु, ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला बहुतांशी यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने रिकव्हरी रेटही सुधारत आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशात कोविड-19 च्या तब्बल 9 लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील 20% पाणीकपात 10% वर आली आहे. 31 जुलै 2021 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 21 ऑगस्टपासून मुंबईत 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. ही पाणीकपात ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना देखील लागू होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे महाराष्ट्र विरुद्ध बिहार या वादावर पडदा पडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयाचे सुशांतचे कुटुंबिय, चाहते आणि बॉलिवूड कलाकारांनी स्वागत केले आहे.