लोकसभा निवडणूक निकाल । File Image

Lok Sabha Election Results 2024: 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज देशासमोर आहेत. लोकसभेच्या ५४२ जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य ९७ कोटी मतदारांनी ठरवले आहे. त्यापैकी गुजरातमधील सुरत लोकसभा जागा वगळता 542 जागांवर आज म्हणजेच 4 जून 2024 रोजी निर्णय होणार आहे. एक्झिट पोल आणि पोल ऑफ पोलमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळत आहे.  देशात 1,224 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. येथे मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेत सुमारे 22 लाख अधिकारी सहभागी आहेत. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल आणि नंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत.

मतमोजणी होताच प्रारंभिक कल दिसून येतील. त्यामुळे देशाच्या गादीवर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे. एका बाजूला एनडीए आहे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्स आहे, एक्झिट पोलने पुन्हा एकदा मोदी सरकारच्या पुनरागमनाचा अंदाज व्यक्त केला आहे. बहुतांश एक्झिट पोलनुसार मोदी सरकार पुन्हा एकदा येणार आहे.

 सरकार स्थापन करण्यासाठी 272 ची गरज आहे

केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला किंवा आघाडीला लोकसभा निवडणुकीत किमान २७२ जागा मिळवाव्या लागतील.