ठळक बातम्या

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’  मधली सोनू लवकरच अडकणार विवाहबंधनात; तारीख माहित आहे का?

टीम लेटेस्टली

गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. आजही मनोरंजनासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका घरोघरी आवर्जुन पाहिली जाते. या मालिकेतील सोनू भिडे लवकरच लग्न करणार आहे.

Sri Lanka vs New Zealand 3rd ODI 2024 Live Streaming: न्यूझीलंडला हरवण्याच्या इराद्याने श्रीलंका तिसऱ्या वनडेत उतरणार, भारतात कधी, कुठे आणि कसा लाइव्ह मॅचचा आनंद लुटता येईल घ्या जाणून

Amol More

दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने न्यूझीलंडचा ३ गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकात 209 धावा केल्या होत्या.

Rashmika Mandanna Cute Bhojpuri: पाटण्यात 'पुष्पा 2' चा ग्रँड ट्रेलर लॉन्च, रश्मिका मंदान्नाचा भोजपुरी आणि अक्षरा सिंगचा डान्स ठरले खास आकर्षण (पाहा व्हिडिओ)

Shreya Varke

'पुष्पा 2: द रुल' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रविवार, 17 नोव्हेंबर रोजी पाटणा येथे एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आपल्या भोजपुरी बोलण्याच्या कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली. आपल्या आवडत्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी हजारो चाहते या कार्यक्रमासाठी गांधी मैदानावर पोहोचले. रश्मिका मंदान्ना हिंदीत म्हणाली, "तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे.

Australia vs Pakistan, 3rd T20I 1st Inning Scorecard: तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा कहर, पाकिस्तानला 117 धावांत गुंडाळले

Amol More

तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या १७ धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला.

Advertisement

Mumbai Shocker: गॅस कर्मचारी भासवून सोन्याच्या दागिन्यांची लूट; घाटकोपरमधील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मुंबईतील घाटकोपर येथे एका विचित्र घटनेत 2 जणांनी गॅस कर्मचारी असल्याचे भासवून एका वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरले. शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी घटना उघडकीस आली.

Kashmera Shah Accident: अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात; सोशल मीडियावर रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत दिली माहिती

Bhakti Aghav

कश्मिरा यांनी अपघाताचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत रक्ताने भिजलेले कपडे दिसत आहेत. कश्मिराने इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये सांगितले की, हा अपघात किती भीषण होता.

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेशी डिजिटल मीडियाद्वारे थेट संवाद

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी डिजिटल मीडिया द्वारे आज (18 नोव्हेंबर) थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? इथे पाहा लाईव्ह.

UP Shocker: यूपीच्या बदायूंमध्ये नवजात मुलाचा सौदा, पैशाच्या लोभापायी वडिलांनी विकले 4 लाखांना!

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील बदायूं येथील कोतवाली भागात एका वडिलांवर पैशाच्या लालसेपोटी नवजात अर्भक ४ लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. बरेली येथील एका निपुत्रिक जोडप्याने नवजात शिशु विकत घेतले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत नवजात अर्भक खरेदी करणाऱ्या दाम्पत्याकडून परत आणून त्याच्या आईच्या ताब्यात दिले. मात्र, नवजात बालकाच्या आईने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

Advertisement

WhatsApp Fake Wedding Scam: विवाह निमंत्रण घोटाळ्यापासून सावधान; APK फायली वापरून सायबर गुन्हेगार पकडतायत सावज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सायबर गुन्हेगार मालवेअर-भरलेल्या एपीके फायलींसह वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी बनावट व्हॉट्सअॅप लग्नाच्या आमंत्रणांचा वापर करीत आहेत. या घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या.

Women Drown In Resort Pool: हृदयद्रावक! मंगळुरूमध्ये एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 महिलांचा रिसॉर्ट पूलमध्ये बुडून मृत्यू; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

निशिता एमडी (21), पार्वती एस (20) आणि कीर्तना एन (21) अशी मृत महिलांची नावे आहेत. तिन्ही महिला म्हैसूर येथील रहिवासी होत्या. या तिघीही 16 नोव्हेंबर रोजी बीचजवळील रिसॉर्ट वाज्को येथे राहण्यासाठी आल्या होत्या.

Kailash Gehlot Joins BJP: कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश, कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कालच गेहलोत यांनी राजीनामा दिला आणि आज त्यांनी भापमध्ये प्रवेश केला.

Delhi Air Pollution: दिल्ली प्रदूषण आणि धुक्यामुळे विमानसेवेचा खोळंबा, 160 उड्डाणे उशीरा, 7 रद्द, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना ॲडव्हायझरी जारी

टीम लेटेस्टली

दिल्लीची हवा सर्वात धोकादायक पातळीवर आहे. आजचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 481 वर पोहोचला आहे. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने पाच उड्डाणे दुसरीकडे वळवण्यात आली आहेत. यात जयपूरला चार, डेहराडूनला एक अशी आकडेवारी आहे.

Advertisement

MBBS Student Dies After Ragging: गुजरातमध्ये वरिष्ठांच्या रॅगिंगमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; 3 तास उभे राहिल्यानंतर पडला बेशुद्ध

Bhakti Aghav

महाविद्यालयाचे डीन डॉ. हार्दिक शाह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री धारपूर, पाटण येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वसतिगृहात वरिष्ठांनी रॅगिंगच्या वेळी तीन तास उभे केल्याने पीडित अनिल मेथानिया बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

Dry Days in Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान ड्राय डे, मतदानासाठी सुट्टी; जाणून घ्या कोणत्या दिवशी मिळणार नाही मद्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काही दिवस 'ड्राय डे' म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे संबंधित तारखेस मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, मतदारांना मतदान करता यावे यासाठी बीएमसीने मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला आहे.

Jalgaon Firing: धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; जळगाव शहरातील घटना; विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार आज संपत असतानाच जळगाव येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Emergency Release Date: अखेर इमर्जन्सीच्या प्रदर्शनाची तारीख ठरली! 'या' दिवशी दाखल होणार थिएटरमध्ये

टीम लेटेस्टली

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. कंगनाने त्याबाबतची घोषणा केली. अभिनेत्रीने सांगितले की, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि आता तो पुढील वर्षी 17 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Nawab Malik's Twitter Account Hack: नवाब मलिक यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; फॉलोअर्संना केलं 'हे' खास आवाहन

Bhakti Aghav

माजी मंत्री नवाब मलिक यांटे एक्स अकाऊंट हॅक झाले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.

Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकल्पात त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रातील नोकऱ्या गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

England vs Ireland, UEFA Nations League 2024-25: इंग्लंडचा आयर्लंडवर 5-0 ने विजय; गुणतालिकेत गाठले पहिले स्थान

टीम लेटेस्टली

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड UEFA नेशन्स लीग 2024-25 सामन्याच्या पहिल्या सहामाहीतही गोष्टी खूपच अडचणीच्या होत्या. एकाही संघाला एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात सामना पूर्णपणे बदलला. हॅरी केनने 53व्या मिनिटाला स्पॉट किकचे गोलमध्ये रूपांतर करून सामन्याला जीवदान दिले.

Maharashtra Election 2024: निवडणूक कर्तव्यांदरम्यान सोमवार आणि मंगळवारी शाळा राहणार सुरू

Shreya Varke

राज्यात सध्या निवडणुकीची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी शैक्षणिक संस्था सुरु राहणार की बंद याबाबत संभ्रम निर्माण झाले होते. दरम्यान, निवडणुकी दरम्यान सर्व शैक्षणिक संस्था सोमवार आणि मंगळवारी नियमित सुरू राहतील. निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त शिक्षक असलेल्या शाळांनी वर्ग सुनिश्चित करण्यासाठी शेजारच्या शाळांमधून पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement