Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर
राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकल्पात त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रातील नोकऱ्या गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
Maharashtra Politics News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे पोस्टर झळकवत काँग्रेस (Congress) खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच्या (BJP) 'एक है तो सेफ है' (Ek Hai Toh Naik Hai) घोषणेची खिल्ली उडवली. ते मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी (18 नोव्हेंबर) सकाळी बोलत होते. राहुल यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास (Dharavi Redevelopment) प्रकल्पावरील चिंता अधोरेखित करत, अशा निविदा सातत्याने पंतप्रधान मोदींच्या सहकाऱ्यांना का अनुकूल असतात? असा सवाल करत गांधी यांनी पंतप्रधानांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.
धारावी प्रकल्पात पक्षपातीपणाचे आरोप
राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वाटपाबाबत टीका केली आणि पंतप्रधानांवर त्यांच्या "व्यावसायिक मित्रांना" अनुकूल असल्याचा आरोप केला. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, "केवळ पंतप्रधान मोदींचे गौतम अदानी यांच्यासारखे जवळचे सहकारीच या निविदा का जिंकतात?" (हेही वाचा, Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार)
'एक है तो सेफ है' मोहिमेची उडवली खिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या 'एक है तो सेफ है' या घोषणेचा उपहासात्मक अर्थ काढत राहुल गांधी यांनी जोरदार खिल्ली उडवली. या वेळ त्यांनी नरेंद्र मोदी आणि अदानी जोपर्यंत एकजूट आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत, असे सूचित करणारे पंतप्रधान मोदी यांचे अदानी यांना अभिवादन करणारे पोस्टरही काँग्रेस नेत्याने प्रदर्शित केले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Gautam Adani: सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु; उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा)
धारावीतील रहिवाशांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा काँग्रेसचा निर्धार
राहुल गांधी यांनी धारावीच्या रहिवाशांना आश्वासन दिले की, काँग्रेस आणि त्यांचे युतीतील भागीदार त्यांचे हक्क धोक्यात आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरोधात खंबीरपणे उभे राहतील. ते म्हणाले की, भाजप निवडक व्यावसायिकांना लाभ मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, तर विरोधी पक्ष स्थानिकांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यास वचनबद्ध आहे. (हेही वाचा, Assembly elections 2024: भाजप आणि महायुती बॅकफूटवर? नरेंद्र मोदी यांचे नरमाईचे धोरण; अजित पवार यांचा अपक्ष उमेदवाराल पाठिंबा)
महाराष्ट्रातील नोकऱ्या आणि विकासाची चिंता
भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रातून 7 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प स्थलांतरित करण्यात आले, ज्यामुळे स्थानिक युवकांच्या 5 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी गमावल्या गेल्या, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. विभाजनवादी वक्तव्ये आणि 'निरुपयोगी घोषणा' वापरून बेरोजगारी आणि महागाई यासारख्या गंभीर समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित केल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदींवर केला.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
विकासाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसची भाजपवर टीका
सामान्य नागरिकांच्या गरजांपेक्षा कॉर्पोरेट हितसंबंधांना भाजपची धोरणे प्राधान्य देतात यावर गांधींनी भर दिला. सामान्य लोकांवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या निर्णयांसाठी विरोधक सरकारला जबाबदार धरणे सुरूच ठेवतील, असे ते म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)