Emergency Release Date: अखेर इमर्जन्सीच्या प्रदर्शनाची तारीख ठरली! 'या' दिवशी दाखल होणार थिएटरमध्ये

कंगनाने त्याबाबतची घोषणा केली. अभिनेत्रीने सांगितले की, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि आता तो पुढील वर्षी 17 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit- X

Emergency Release Date: कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची घोषणा केली. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तिने सांगितली आहे. 17 जानेवारी 2025 ला भारत चित्रपट रिलीज होणार आहे.यासह, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो देखील अपडेट केला आहे. हा फोटो इमर्जन्सीच्या (Emergency Movie) सेटवर काढलेला फोटो आहे. ज्यात कंगना हात जोडून नमस्कार करताना दिसली. बाकीचे क्रू देखील शुभेच्छा देताना दिसत आहेत.

कंगनाच्या होम प्रॉडक्शन बॅनर मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: कंगनाने घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होणे किती महत्त्वाचे आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत पुढे ढकलल्याने कंगनाला बराच काळ अडचणीत टाकले होते. अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

'या' दिवशी दाखल होणार थिएटरमध्ये

इमर्जन्सी हा चित्रपट यापूर्वी 14 जून 2024 रोजी रिलीज होणार होता. पण कंगनाच्या राजकीय प्रचारामुळे तिला तो पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर 6 सप्टेंबर ही त्याची रिलीज डेट निश्चित करण्यात आली होती, परंतु यावेळी या चित्रपटावर अनेक आक्षेप घेतल्याने प्रदर्शनात अडथळे आले. हा चित्रपट इंदिरा गांधी आणि देशातील आणीबाणीच्या कथेवर आधारित असल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सीबीएफसीने यापूर्वी चित्रपटाला प्रमाणपत्र दिले होते. परंतु शीख समुदायाकडून चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला. शीख समुदायाच्या लोकांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा केंद्र सरकारने अद्याप निर्मात्यांना प्रमाणपत्र दिले गेले नाही असे सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif