Israeli strikes on Lebanon: इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला; टायर प्रदेशात 11 ठार, 48 जखमी, हिजबुल्लाशी तणाव वाढला

लेबनॉनच्या टायर प्रदेशात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात 11 जण ठार आणि 48 जखमी. आयडीएफच्या कारवाईत हिजबुल्लाचे माध्यम प्रमुख मोहम्मद अफीफ यांच्या मृत्यूनंतर हे हल्ले झाले आहेत.

Israeli Airstrike | Representative Image | (Photo Credit- ANI)

इस्त्रायलने लेबनॉनच्या टायर (Lebanon Tyr Region) प्रांतात हवाई हल्ला (Israeli Airstrikes) केला. ज्यामध्ये किमान 11 लोक ठार आणि 48 जखमी झाले, असे वृत्त एएफपीने लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला (Hezbollah) यांच्यात काही आठवड्यांपासून वाढलेल्या तणावानंतर हे हल्ले झाले आहेत. दरम्यान, अल जझीराने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात इस्रायली लष्करी (Israel Defense Forces) कारवाईमुळे टायर प्रदेशातील अनेक वारसा स्थळांचे (ऐतिहासिक ठिकाणांचे) लक्षणीय नुकसान झाल्यानंतर आणि 16 लोक जखमी झाल्यानंतर अवघ्या काहीच काळात हे हल्ले झाले. वृत्तसंस्था एएनआयनेही याबाबत वृत्त दिले आहे.

बेरूत हल्ल्यात हिजबुल्ला मीडिया प्रमुख ठार

लेबनॉनमधील टायर प्रांतात हल्ला होण्यापूर्वी इस्त्रायलने रुविवारी बैरुत येथे हल्ला केला. ज्यामध्ये ज्यात हिजबुल्लाचे (Hezbollah) प्रवक्ते मोहम्मद अफीफ ठार झाले. टाइम्स ऑफ इस्रायलने इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा (IDF) हवाला देत या कारवाईला दुजोरा दिला. ज्यात अफीफला "हिजबुल्लाचा वरिष्ठ लष्करी कार्यकर्ता" म्हणून संबोधले गेले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या निवेदनात, आयडीएफने म्हटले आहे की, आफिफचा इस्रायलविरुद्धच्या हिजबुल्लाच्या मोहिमांमध्ये थेट सहभाग होता आणि त्याचे वर्णन "हिजबुल्लाचा मुख्य प्रचारक आणि प्रवक्ता" असे केले आहे. (हेही वाचा, Israeli Airstrike in Beirut: इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता Mohammad Afif ठार)

आयडीएफने काय म्हटले?

आयडीएफने आपल्या भूमिकेवर ठाम राहात स्पष्टीकरणादाखल देलेले मुद्दे खालील प्रमाणे:

इस्त्राईलच्या डिफेन्स फोर्सचे स्पष्टीकरण

बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराजवळ स्फोट

दरम्यान, नेत्यनाहू यांच्या सिजेरियातील खासगी निवासस्थानाजवळ आग लावणे, घातपाती कृत्य करणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटना घडली तेव्हा नेत्यानाहू किंवा त्यांच्या कुटुंबापैकी इतर कोणताही सदस्य घरात उपस्थित नव्हता. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये हिजबुल्लाच्या ड्रोनने नेतान्याहूच्या निवासस्थानी हल्ला केला होता, ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले होते. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, ड्रोन शयनगृहाच्या खिडकीवर आदळले, परंतु प्रबलित काचेच्या आत प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले.

अलिकडील काही काळात इस्त्राईल आणि इतर काही छोट्या-मोठ्या राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. ज्याची सुरुवात पॅसेस्टीनपासूनच्या संघर्षाने झाले. त्यानंतर इराण आणि लेबनॉन हे देशही इस्त्राईलसोबतच्या संघर्षात उतरल आहेत. दरम्यान, हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाल्याने लेबनॉनच्या टायर प्रदेशातील परिस्थिती गंभीर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now