Delhi Air Pollution: दिल्लीतील वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत; GRAP-IV निर्बंध लागू, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु

संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरात GRAP-IV निर्बंध लादले गेले आहेत. बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली असून, वर्ग ऑनलाईन सुरु आहेत.

Delhi Air Pollution | (Photo Credit- X)

देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (18 नोव्हेंबर) वायुप्रदुषणामुळे घसरलेली हवेची गुणवत्ता आणि विषारी धुके यांमुळे व्यापून गेली. शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक या हंगामातील सर्वोच्च, म्हणजेच 481 वर पोहोचला. ज्यामुळे या हंगामातील प्रदूषणाची सर्वोच्च पातळी नोंदली गेली. परिणामी शहरातील दृश्यमानता कमी झालीच. परंतू, नागरिकांवा श्वसनासही त्रास होऊ लागला. शहरासा श्वास कोंडला. हवेची गुणवत्ता ढासळल्याने, अधिकाऱ्यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनच्या स्टेज IV अंतर्गत प्रदूषणविरोधी (GRAP) कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने हे निर्बंध जाहीर केले आहेत.

दिल्ली शहरातील प्रदुषण पातळीमुळे निर्माण झालेली समस्या निवारणासाठी शासन आणि प्रशासन सक्रीय झाले आहे. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या चौथ्या टप्प्याअंतर्गत (GRAP-IV) कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर , वाहनांवरील निर्बंध आणि बांधकाम उपक्रम पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत. (हेही वाचा, Weather Forecast Today: मुंबईमध्ये दाट धुके, तापमान 28 ते 31अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता)

दिल्लीचा एक्यूआय घसरला

दिल्लीच्या अनेक भागांमध्ये एक्यूआयची पातळी 500 च्या जवळपास नोंदवली गेली. शहरातील विविध उपनगरांमधील हवेची गुणवत्ता पातळी खालील प्रमाणे:

GRAP-IV उपाययोजना जाहीर

वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) सोमवारी सकाळी 8 वाजता राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये जीआरएपी-IV अंतर्गत 8-बिंदू कृती योजना सक्रिय केली. प्रमुख निर्बंधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहेः

दिल्लीमध्ये प्रचंड प्रदुषण

दरम्यान, "आर. ए. पी.-4 लागू झाल्यामुळे, इयत्ता 10 वी आणि 12 वी वगळता सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्ग बंद केले जातील. पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा ऑनलाईन वर्ग घेतील, असे मुख्यमंत्री अतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले.

आरोग्य सल्लागार आणि खबरदारी अधिकाऱ्यांनी रहिवाशांना बाह्य कृती मर्यादित करण्याचे, मास्क घालण्याचे आणि घरी एअर प्युरिफायर वापरण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुले, वृद्ध आणि आधीपासून श्वसनाचा त्रास असलेल्यांसाठी हवेची खालावत जाणारी गुणवत्ता हा आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे.