Dry Days in Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान ड्राय डे, मतदानासाठी सुट्टी; जाणून घ्या कोणत्या दिवशी मिळणार नाही मद्य
ज्यामुळे संबंधित तारखेस मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, मतदारांना मतदान करता यावे यासाठी बीएमसीने मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला आहे.
Dry Days List For Maharashtra: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर, मुंबईसह अनेक शहरांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ड्राय डे (Dry Days in Maharashtra) घोषीत करण्यात आले आहेत. हे ड्राय डे निवडणूक आगोगाने आखून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचा भाग असतील. त्यामुळे ड्राय डे दरम्यान कोणत्याही विक्रेत्यास मद्यविक्री करण्यास परवानगी नसेल. ड्राय डे चा कालावधीही ठरवून देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई शहरात राहणाऱ्या नोकरदार वर्गास मतदान करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेने येत्या 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी असेल ड्राय डे?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि ड्राय डे वेळापत्रक
सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत जबाबदार सहभाग सुलभ करण्यासाठी, निवडणूक आयोगाने दारू बंदीसाठी खालील तारखा जारी केल्या आहेतः
18 नोव्हेंबरः संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी.
19 नोव्हेंबरः मतदानाच्या एक दिवस आधी संपूर्ण दिवस ड्राय डे असेल.
20 नोव्हेंबरः मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी राहील.
23 नोव्हेंबरः निवडणुकीचे निकाल जाहीर होताच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ड्राय डे लागू केला जाईल.
या उपाययोजनांचा उद्देश निवडणूक प्रक्रियेतील अडथळे टाळणे आणि 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणाऱ्या राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये निवडणुका सुरळीत पार पाडणे सुनिश्चित करणे हा आहे. (हेही वाचा, Dry Days in Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 4 दिवस ड्राय डे; गोवा मध्येही निर्बंध लागू राहणार)
मतदानाच्या दिवशी बीएमसीकडून सुट्टी जाहीर
मतदानाच्या टक्केवारीला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 20 नोव्हेंबर 2024 ही सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली आहे.
अनुपस्थितीसाठी दंड नाहीः मतदानासाठी सुट्टी घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार कपातीचा किंवा दंडाचा सामना करावा लागू शकत नाही.
कडक अंमलबजावणीः पालिका आणि आचारसंहिता निर्देशांचे पालन न करणाऱ्या नियोक्त्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा बीएमसी आयुक्त भूषण गागराणी यांनी दिला आहे.
शांततामय निवडणुकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न
ड्राय डे आणि घोषित सुट्टी हे नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्यास सक्षम करताना शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखीत करतात. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया समाप्त होऊन, नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु होतील. राज्यातील जनता कोणाला कौल देते याबाबत प्रचड उत्सुकता निर्माण झाली आहे. देशभरातील जनतेचे महाराष्ट्राकडे लक्ष लागले आहे.