ठळक बातम्या

Nana Patole Resigns As Maharashtra Congress Chief: काँग्रेसला मोठा धक्का! विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोलेंनी दिला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Bhakti Aghav

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 103 जागांपैकी फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला. ही काँग्रेसची राज्यातील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात पटोले यांनी केवळ 208 मतांच्या फरकाने विजय मिळविला.

Australia vs India 1st Test 2024 Day 4 Tea Break: सुंदरची शानदार गोलंदाजी, भारत विजयापासून दोन विकेट दूर; टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया 227/8

Nitin Kurhe

वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 307 धावांची गरज आहे. आणि भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज आहे.

Israeli-Lebanon War: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात मोठी जिवीतहानी, बेरूत हल्ल्यात 29 ठार

Jyoti Kadam

लेबनॉनमध्ये इस्त्रायने पुन्हा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले. मध्य बेरूतच्या दाट लोकवस्तीतील एका उंच निवासी इमारतीवर हा हल्ला झाला.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाचा लिलाव किती वाजता होणार सुरू? 493 खेळाडूंवर लावली जाणार बोली

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction: लिलावाचा पहिला दिवस पूर्ण झाला असून, यामध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, ज्यामध्ये 467.95 रुपये खर्च करण्यात आले. आता दुसऱ्या दिवशी एकूण 493 खेळाडूंवर बोली लावायची आहे.

Advertisement

Sambhal Jama Masjid Case: संभलमध्ये मशिद सर्वेक्षणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात 4 मृत्यू; परिसर सील, इंटरनेट-शाळा बंद

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमधील संभल येथे काल झालेल्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारानंतर संभलमध्ये 24 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहणार आहेत.

Food Poisoning in Hyderabad: ग्रील्ड चिकन आणि बिर्याणी खाल्ल्याने 3 मित्रांना विषबाधा; रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल

Jyoti Kadam

हैदराबादच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिर्याणी आणि ग्रील्ड चिकन खाल्ल्यानंतर तीघे आजारी पडले. त्यांना एकाच वेळी तीव्र उलट्या, जुलाब आणि मळमळचा त्रास जाणवू लागला.

Indian Stock Markets: महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचा सकारात्मक परिणाम? शेअर बाजार वधारला; निफ्टी 50 ची उडी, सेन्सेक्समध्येही हिरवळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी तेजी पाहाला मिळाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल भाजप आणि महायुतीच्या बाजूने सकारात्मक आल्यानंतर ही तेजी आल्याचे विश्लेशन अभ्यासकांनी केले आहे.

Clash Between Two Families: छतरपूरमध्ये जमिनीच्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये भांडण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Shreya Varke

छतरपूर येथे शनिवारी जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात डझनहून अधिक जण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमिनीच्या वादातून शनिवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कररी गावात ही घटना घडली. व्हिडिओमध्ये लोक लाठ्या-काठ्या मारताना दिसत आहेत, ज्यामध्ये महिलाही हिंसाचार करताना आणि पुरुषांवर क्रूरपणे हल्ले करताना दिसत आहेत.

Advertisement

IND vs AUS 1st Test Day 4 Live Score Update: बुमराह पुन्हा बनला संकटमोचक, हेड आऊट; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

Nitin Kurhe

लंच ब्रेकपनंतर धोकादायक ठरलेल्या हो हेडला जसप्रीत बुमराहने अखेर बाद केले. 89 च्या वैयक्तिक स्कोअरवर ऋषभ पंतने त्याला विकेटच्या मागे झेलबाद केले. भारतासाठी हे मोठे यश आहे.

Raj Kapoor Biopic: राज कपूरच्या बायोपिकवर रणबीर कपूरचं वक्तव्य, म्हणाला- 'हा खूप कठीण बायोपिक असेल'

Shreya Varke

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याने भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ग्रेटेस्ट शोमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांच्या जीवनावर आधारित बायोपिकबाबत त्यांचे विचार शेअर केले आहेत. अलीकडेच गोव्यात झालेल्या ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (इफ्फी) रणबीरला विचारण्यात आले की, तो त्याचे आजोबा राज कपूर यांच्यावर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे का? यावर रणबीर म्हणाला, “मी यावर खूप विचार केला आहे आणि संजय लीला भन्साळींसह अनेक चित्रपट दिग्दर्शकांशी चर्चाही केली आहे.

All Teams after First Day of Auction: पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर सर्व संघांची कशी आहे स्थिती, एका क्लिकवर येथे जाणून घ्या A to Z संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

पहिला दिवस संपला, ज्यामध्ये ऋषभ पंतला सर्वात मोठी बोली लागली. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर श्रेयस अय्यर दुसरा महागडा खेळाडू ठरला. पंजाबने त्याला 26 कोटी 75 लाखमध्ये संघात दाखल केले आहे.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 861 आहे. महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 441 आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 25 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 25 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs AUS 1st Test Day 4 Lunch Break: भारत विजयापासून 5 विकेट दूर, लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया 104/5; हेड पुन्हा ठरतोय डोकेदुखी

Nitin Kurhe

लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 विकेट गमावून 104 धावा आहे. भारताच्या विजयात ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी ठरतोय. तो 63 धावांवर तुफानी फलंदाजी करत आहे. त्याला मिचेल मार्श साथ देत आहे.

Indonesia Floods: इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा येथे भूस्खलन आणि पुरामुळे 13 जणांचा मृत्यू; 18 जखमी

Jyoti Kadam

इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रा (Sumatra)प्रांतात आपत्ती व्यवस्थापन आणि शमन एजन्सींच्या माहितीवरून पुरात 13 जणांचा मृत्यू झाला. तर, 18 जण जखमी झालेत.

Winter Session of Parliament Begins Today: संख्याबळ वाढूनही विरोधक गळपाटले? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काय होणार? सत्ताधाऱ्यांची रणनिती ठरली? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'एक राष्ट्र, एक निवडणूक' प्रस्तावासह प्रमुख विधेयकांसह संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अलीकडील निवडणुकीतील पराभवांच्या दरम्यान विरोधी पक्ष गंभीर मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणे अपेक्षीत आहे.

Advertisement

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे 5 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद

Shreya Varke

मणिपूर सरकारने सोमवारी आणि मंगळवारी पाच जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी रविवारी सरकारने या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून वर्ग सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र नंतर आदेश बदलला आहे.

Google Doodle Celebrating Chess: जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आणि खेळाच्या सन्मानार्थ खास गूगल डूडल; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल डूडलद्वारे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आणि खेळाचा उत्साह साजरा करत आहे. विशेष म्हणजे या खेळाचे मूळ भारतात आहे. जे आता जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Parliament Winter Session 2024: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज पासून होणार सुरु,वक्फ ते बँकिंग कायदे विधेयकावर होणार चर्चा

Shreya Varke

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्यात वक्फ कायदा (दुरुस्ती) विधेयकासह विविध विधेयकांवर चर्चा होणार आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: आयपीएल मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने मोहित शर्माला 2 कोटी 20 लाख रुपयांना घेतले विकत

Amol More

या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.

Advertisement
Advertisement