Indian Stock Markets: महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचा सकारात्मक परिणाम? शेअर बाजार वधारला; निफ्टी 50 ची उडी, सेन्सेक्समध्येही हिरवळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल भाजप आणि महायुतीच्या बाजूने सकारात्मक आल्यानंतर ही तेजी आल्याचे विश्लेशन अभ्यासकांनी केले आहे.

Indian Stock Markets | | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Markets) सोमवारी पुन्हा एकदा नव्याने पुनरागमन करताना दिसला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी फिफ्टी (Nifty 50) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सेन्सेक्स (Sensex) दमदार कामगिरी करताना दिसले. बाजार विश्लेषक आणि तज्ज्ञांनी बाजाराच्या या वधाराचा संबंध महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाशी (Maharashtra Election Results 2024) लावला. विश्लेषकांचे म्हणने असे की, सत्ताधारी भाजप आणि महायुतीस जनतेने पूर्ण बहुमताने कौल दिल्याने गुंतवणुकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. परिणामी खरेदीदारांनी उत्साह दाखवला. ज्याचा परिणाम निफ्टी 50 निर्देशांक 1.45 टक्क्यांहून अधिक वाढून 346.30 अंकांनी म्हणजेच 24,253.55 अंकांवर, तर बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 1,076 अंकांनी म्हणजेच1.36 टक्क्यांनी वाढून 80,193.47 अंकांवर उघडण्यात झाला.

निवडणूक निकालाचे सकारात्मक परिणाम

भारतीय शेअर बाजार तज्ज्ञ आणि विश्लेषक अजय बग्गा यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, भाजपच्या विजयामुळे शेअर बाजाराच्या कामगिरीला अल्पकालीन चालना मिळू शकते. गुंतवणूकदारांना हा जनादेश महाराष्ट्रातील चालू असलेल्या कॅपेक्स आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सकारात्मक संकेत म्हणून दिसतो. लाभार्थी क्षेत्रांमध्ये उद्योग, पायाभूत सुविधा, उत्पादन, स्थावर मालमत्ता आणि वित्तीय क्षेत्रांचा समावेश आहे, असे बग्गा यांनी सांगितले. (हेही वाचा, Gold vs Silver Prices: चांदीची दीर्घकाळात सोन्यापेक्षा चांगली कामगिरी, किंमत प्रति किलो 1.25 लाख रुपयेपर्यंत पोहोचण्याचा अंदाजः एमओएफएसएल)

बाजार मरगळ झटकण्याच्या तयारीत

अॅक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अक्षय चिंचळकर म्हणाले, पाठिमागील 20 दिवसांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकत बाचार पुन्हा एकदा दमदार कामगिरीसाठी सज्ज झाल्याचे आपण म्हणून शकतो. सर्व नकारात्मकता पाठीमागे टाकून, आम्ही 20 दिवसांच्या घसरणीची सरासरी 24,030 वर मागे टाकू शकतो. जी 27 सप्टेंबरच्या विक्रमी उच्चांकापासून कधीही ओलांडली गेली नाही. कल असे सूचित करतात की आता आणि वर्षाच्या अखेरीस सरासरी परतावा 4% पेक्षा जास्त असलेल्या बाजाराच्या सकारात्मक हालचालीची 80% शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय शेअर बाजारातील क्षेत्रीय कामगिरीः

आशियातील इतर बाजारपेठाः

दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून शेअर बाजार चढ उतार पाहात आहे. पाठिमागील 20 दिवसांमध्ये तर मार्केट सातत्याने पडत आहे. लोकडाऊन नंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर वधार पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा काळ मानले जाते.