TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाचा लिलाव किती वाजता होणार सुरू? 493 खेळाडूंवर लावली जाणार बोली
TATA IPL 2025 Mega Auction: लिलावाचा पहिला दिवस पूर्ण झाला असून, यामध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, ज्यामध्ये 467.95 रुपये खर्च करण्यात आले. आता दुसऱ्या दिवशी एकूण 493 खेळाडूंवर बोली लावायची आहे.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरू आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावाचा पहिला दिवस पूर्ण झाला असून, यामध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, ज्यामध्ये 467.95 रुपये खर्च करण्यात आले. आता दुसऱ्या दिवशी एकूण 493 खेळाडूंवर बोली लावायची आहे. आता दुसऱ्या दिवसाचा लिलाव कधी आणि कुठे पाहायला मिळणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत असेल तुम्ही येथे जाणून घ्या... (हे देखील वाचा: All Teams after First Day of Auction: पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर सर्व संघांची कशी आहे स्थिती, एका क्लिकवर येथे जाणून घ्या A to Z संपूर्ण तपशील)
दुसऱ्या दिवसाचा लिलाव किती वाजता सुरू होणार?
मेगा लिलावाचा दुसरा दिवस भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवसाचा लिलावही याच वेळेवर सुरु झाला होता.
कुठे पाहणार लाइव्ह?
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. लिलावाच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर असेल.
एकूण 132 स्लॉट बाकी
दुस-या दिवशी 493 खेळाडूंसाठी बोली लागणार असून त्यापैकी जास्तीत जास्त 132 खेळाडूंचीच विक्री होऊ शकते. कारण सर्व संघांना मिळून केवळ 132 जागा रिक्त आहेत.
सर्व संघांकडे दुसऱ्या दिवसासाठी किती पैसे आहे शिल्लक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- 30.65 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स- 26.10 कोटी रुपये
पंजाब किंग्स- 22.50 कोटी रुपये
गुजरात टायटन्स- 17.50 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स- 17.35 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्ज- 15.60 कोटी रुपये
लखनौ सुपर जायंट्स- 14.85 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स- 13.80 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स- 10.05 कोटी
सनरायझर्स हैदराबाद- 5.15 कोटी रुपये
कोणत्या संघाकडे किती स्लॉट शिल्लक आहेत?
चेन्नई सुपर किंग्ज- 12 स्लॉट
दिल्ली कॅपिटल्स- 12 स्लॉट
गुजरात टायटन्स- 14 स्लॉट
कोलकाता नाइट रायडर्स- 12 स्लॉट
लखनौ सुपर जायंट्स- 12 स्लॉट
मुंबई इंडियन्स- 09 स्लॉट
पंजाब किंग्स- 12 स्लॉट
राजस्थान रॉयल्स- 11 स्लॉट
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- 09 स्लॉट
सनरायझर्स हैदराबाद 13 स्लॉट
लिलावात पहिल्या दिवसानंतर सर्व संघांची स्थिती
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)
महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, करुण नायर
गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
राशिद खान, शुभमन गिल, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, साई सुदर्शन, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, निशांत सिंधू
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)
ऋषभ पंत, निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, आयुष बडोनी, मोहसीन खान, मिचेल मार्श, एडन मार्कराम
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नरेन, एनरिक नोर्किया, हर्षित राणा, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, आंग्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.
पंजाब किंग्ज (Punjab Kings)
श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग, जोफ्रा आर्चर, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, ॲडम झाम्पा, अर्थव तायडे
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bangalore)
विराट कोहली, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, यश दयाल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)