Sambhal Jama Masjid Case: संभलमध्ये मशिद सर्वेक्षणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात 4 मृत्यू; परिसर सील, इंटरनेट-शाळा बंद
या हिंसाचारानंतर संभलमध्ये 24 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहणार आहेत.
Sambhal Jama Masjid Case: उत्तर प्रदेशमधील संभल येथे जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला. ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, एसपीसह काही पोलिसही जखमी झाले. हिंसक जमावाने अनेक वाहनांची तोडफोड करून ती पेटवून दिली. परिस्थईती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, गोळीबार झाला. अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या गेल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करून त्या हल्लेखोरांना तेथून पळवून लावले. (Sambhal Violence: संभलमध्ये मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलन; परिसर सील, 3 मृत्यू, 15 अटक)
तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संभलमध्ये २४ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हिंसाचारात सामील असलेल्यांवर एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर संभलमध्ये २४ तास इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सर्व शाळा महाविद्यालये आज बंद राहणार आहेत.
प्रशसनाने 1 डिसेंबरपर्यंत बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला येण्यावर कडक बंदी घातली आहे. संपूर्ण शहरात कर्फ्यूसारखे वातावरण आहे. या हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण आहे. पोलिसांच्या गोळीबारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी या वृत्ताला नाकारले आहे. या घटनेत पोलिसांनी 21 जणांना हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. तर 400 हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.