ठळक बातम्या
Kenya Metal Ring: केनियामधील गावात आकाशातून पडली रहस्यमय धातूची रिंग; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण (Watch Video)
Bhakti Aghavअंदाजे 2.5 मीटर व्यासाची ही धातूची वस्तू रॉकेट प्रक्षेपणापासून विभक्त रिंग असल्याचे मानले जात आहे. केनिया स्पेस एजन्सी (KSA) आणि स्थानिक प्राधिकरण ऑब्जेक्टचा प्रभाव आणि उत्पत्ती तपासत आहेत.
ISRO Grows Cowpea Seeds in Space: इस्रोचा चमत्कार! अवकाशात उगवल्या चवळीच्या बिया; पहा फोटो
Bhakti Aghavया चवळीच्या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्ही सी 60 रॉकेटद्वारे स्पेड एक्ससह पाठवण्यात आल्या होत्या. या प्रयोगाद्वारे, शास्त्रज्ञांना अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील हे समजू शकणार आहे, ज्यामुळे अंतराळातील दीर्घ कार्यात मदत होणार आहे.
शाहिद कपूरच्या ॲक्शन थ्रिलर 'देवा'चा टीझर उद्या रिलीज होणार, चित्रपट 31 जानेवारीला थिएटरमध्ये होणार दाखल
Amol Moreटीझर रिलीजची घोषणा करताना तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सांगितले की, हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओ आणि नेटफ्लिक्सद्वारे 'देवा' जगभरात प्रदर्शित होणार आहे.
Knife Piece Found in Pizza: धक्कादायक! ऑर्डर केलेल्या डॉमिनोज पिझ्झामध्ये आढळला चाकुचा तुकडा; पिंपरी चिंचवड येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकुचा तुकडा आढळला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात असलेल्या इंद्रायणीनगर येथे घडली. सदर खाद्यपदार्थाची ऑर्ड डॉमिनोज आऊटलेटमधून करण्यात आली होती.
Triple Talaq On Video Call in Mumbai: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पतीने व्हिडिओ कॉलवर दिला तिहेरी तलाक, हुंड्यासाठीही छळ, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Jyoti Kadamसीवूड्स येथील एका महिलेला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या तिच्या पतीने व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NZ vs SL 1st ODI 2025 Preview: न्यूझीलंड आणि श्रीलंकेत रंगणार पहिला एकदिवसीय सामना, जाणून घ्या कूठे पाहू शकता लाईव्ह मॅच
Amol Moreन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका ODI मध्ये हेड टू हेड रेकॉर्ड: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 105 सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडने 52 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 43 वेळा विजय मिळवला आहे.
Kiara Advani Hospitalised: कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? 'गेम चेंजर'च्या प्रमोशनला अनुउपस्थित राहिली, आता टीमने दिलं स्पष्टीकरण
Bhakti Aghavराम चरण (Ram Charan) आणि कियारा यांनी अलीकडेच चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीची तब्येत बिघडल्याची बातमी शनिवारी समोर आली. आता अभिनेत्रीच्या टीमने सर्व सत्य सांगून तिच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे.
Telangana Man Guinness Record: 'ड्रिल मॅन', जिभेने थांबवले 57 इलेक्ट्रिक पंख्यांची पाती; तेलंगणातील व्यक्तीच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTelangana News: तेलंगणातील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा यांनी एका मिनिटात 57 इलेक्ट्रिक पंख्याचे ब्लेड आपल्या जिभेने थांबवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचा हा अनोखा पराक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma: 'मी दोन मुलांचा बाप आहे आणि मला माहीत आहे...', रोहित शर्माने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर; निवृत्तीबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Nitin Kurheसततच्या फ्लॉप कामगिरीमुळे रोहित पाचव्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला. त्याच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जात आहे. रोहित शर्माने त्याच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना आणि टीकाकारांना आता सडेतोड उत्तर दिले आहे.
Delhi Fake Model Dating App Scam: अमेरिकन मॉडेल असल्याचे भासवून 700 महिलांची फसवणूक; खाजगी फोटो-व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल
Jyoti Kadamनोएडा येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने अमेरिकन मॉडेल असल्याचे दाखवून तब्बल 700 महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Farhan Akhtar Supports Rohit Sharma: फरहान अख्तर आला रोहित शर्माच्या समर्थनार्थ, शेअर केली खास इन्स्टा पोस्ट; ट्रोलर्सना फटकारले
Nitin Kurheरोहितच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. रोहितला सपोर्ट करण्यासोबतच फरहानने ट्रोल करणाऱ्यांनाही फटकारले आहे.
Ryan Rickelton Double Century: रायन रिकेल्टनचे पाकिस्तान विरुद्ध शानदार द्विशतक, दक्षिण आफ्रिकेची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
Amol Moreरिक्लेटनने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला कॅप्टन टेंबा बावुमाचीही त्याला चांगली साथ मिळाली. बावुमाने काल शतक झळकावून बाद झाला. त्याने 179 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 बाद 376 धावाकरून खेळत आहे.
IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवला लागले 'ग्रहण', सतत होत आहे फ्लॉप; आकडेवारी देत आहे टेन्शन
Nitin KurheSuryaKumar Yadav मुंबईसाठी मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे. मात्र, सूर्यकुमार यादव सातत्याने फ्लॉप होत असून, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी (IND vs ENG T20I Series 2025) त्याने संघाची चिंता वाढवली आहे. या महिन्यात भारताला पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.
Army Vehicle Falls Into Gorge In J&K's Bandipora: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 2 जवानांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी
Bhakti Aghavया अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी एएनआयला सांगितले की, रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.
India's Tobacco Control: कायदे कडक असूनही भारतात तंबाखू नियंत्रण अयशस्वी? सार्वजनिक आरोग्य संकटात? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCOTPA आणि NTCP सारखे कठोर कायदे असूनही, भारतात तंबाखू नियंत्रण कुचकामी राहिले आहे. धोरणातील अपयशांमागील कारणे आणि सार्वजनिक आरोग्यावर त्यांचा प्रभाव जाणून घ्या.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Full Highlights: सिडनी कसोटी रोमांचक वळणावर, भारताने घेतली 145 धावांची आघाडी; येथे पाहा दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण हायलाइट्स एका क्लिकवर
Nitin Kurheदुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा (8) तर सुंदर (6) धावांंवर नाबाद आहे.
Mega Block on Sunday, January 5, 2025: मध्य रेल्वे, हार्बर आणि वेस्टर्न लाईनवर उद्या मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहून प्रवास करा
Jyoti Kadamरविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे, हार्बर, वेस्टर्न आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व मार्गांवरील सेवांवर विलंब होऊ शकतो.
Delhi Assembly Election 2025: भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; Parvesh Verma अरविंद केजरीवाल विरोधात लढणार
Bhakti Aghavकालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे, तर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात तिकीट दिलं आहे.
Yuzvendra Chahal आणि Dhanashree Verma यांचा घटस्फोट? Instagram वरून सर्व फोटो हटवले, एकमेकांना केले अनफॉलो
Nitin Kurheइंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर आले मोठे अपडेट, दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार की नाही घ्या जाणून
Nitin Kurheऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा जसप्रीत बुमराह सामन्याच्या मध्यभागी अचानक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर प्रशिक्षण किटमध्ये स्टेडियम सोडताना दिसला. त्यावेळी बुमराहला मैदानावर काही त्रास झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती.