Farhan Akhtar Supports Rohit Sharma: फरहान अख्तर आला रोहित शर्माच्या समर्थनार्थ, शेअर केली खास इन्स्टा पोस्ट; ट्रोलर्सना फटकारले
रोहितच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. रोहितला सपोर्ट करण्यासोबतच फरहानने ट्रोल करणाऱ्यांनाही फटकारले आहे.
Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाचवा कसोटी सामना (IND vs AUS 5th Test 2025) खेळला जात आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पाचव्या सामन्यात खेळत नाहीये. खराब फॉर्ममुळे त्याने मालिकेतील शेवटच्या सामन्यातून स्वतःला बाहेर ठेवले आहे. पाचव्या आणि शेवटच्या सामन्यासह रोहितचे नाव चर्चेत आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. रोहित शर्मा आज आपल्या खराब फॉर्मशी झुंजत असला तरी रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत हे अजिबात नाकारता येणार नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे जेतेपद. आता रोहितच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. रोहितला सपोर्ट करण्यासोबतच फरहानने ट्रोल करणाऱ्यांनाही फटकारले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)