Rohit Sharma: 'मी दोन मुलांचा बाप आहे आणि मला माहीत आहे...', रोहित शर्माने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर; निवृत्तीबद्दल सांगितली मोठी गोष्ट
सततच्या फ्लॉप कामगिरीमुळे रोहित पाचव्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला. त्याच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जात आहे. रोहित शर्माने त्याच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना आणि टीकाकारांना आता सडेतोड उत्तर दिले आहे.
Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) बरीच टीका होत आहे. सततच्या फ्लॉप कामगिरीमुळे तो पाचव्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला. त्याच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जात आहे. रोहित शर्माने त्याच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना आणि टीकाकारांना आता सडेतोड उत्तर दिले आहे. तो म्हणाला, “बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोक काय बोलत आहे काय लिहत आहे यावर आमची लाइफ चेंज होत नाही. मी खूप दिवसांपासून हा खेळ खेळत आहे. मला केव्हा निवृत्ती घ्यायची, कधी बाहेर बसायचे किंवा संघाचे नेतृत्व केव्हा करायचे हे बाहेरून कोणीही ठरवू शकत नाही. मला खूप समज आहे. मी प्रौढ आहे, दोन मुलांचा बाप आहे. मला माहित आहे की मला आयुष्यात काय हवे आहे. पाच महिन्यांनंतर काय होईल यावर माझा विश्वास बसत नाही. मला वर्तमानावर लक्ष केंद्रित करायचे आहे. हा निर्णय म्हणजे निवृत्तीचा निर्णय नाही. मी बॅटने चांगली कामगिरी करत नव्हतो आणि त्यामुळेच मी या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्माने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)