ठळक बातम्या
PM Kisan Yojana: पती-पत्नी दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या, काय म्हणतात नियम
Shreya Varkeकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) सुरू केली आहे, ज्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हप्ते जमा केले असून, १९ वा हप्ता लवकरच येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नवरा-बायको दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल का, विशेषत: त्यांच्याकडे एकच शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
Reliance Jio IPO: मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ लॉन्च करणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? $120 अब्ज पेक्षा जास्त असू शकते मूल्य, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीया आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक नवीन शेअर विक्री आणि ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे शेअर जारी करतील. कंपनी तिच्या इश्यूमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट क्लॉज देखील ठेवू शकते. या आईपीओद्वारे, रिलायन्स जिओचे मूल्य $ 120 अब्जपर्यंत पोहोचू शकते.
Guidelines For HMPV Virus: चीनमधील मानवी Metapneumovirus च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वाढवली खबरदारी; आरोग्य विभागाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
Bhakti Aghavसध्या चीनमध्ये हा विषाणू वेगाने पसरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये पसरलेल्या मेटाप्युमोव्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी (Guidelines For HMPV Virus) केली आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरचा उद्रेक झाला होता. आता पुन्हा एकदा चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रकरणांना प्रतिसाद म्हणून, भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
Thane: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांना धमकी, शिवीगाळ केली; गुन्हा दाखल
Prashant Joshiआरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली.
Ladki Bahin Yojana To Stop? महिलांसाठी असलेल्या लाडकी बहिण योजनेचा सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेवर परिणाम; राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कृषिमंत्री Manikrao Kokate यांची माहिती
टीम लेटेस्टलीया योजनेमुळे, महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाला थोडा विलंब होईल, असे ते म्हणाले. कोकटे म्हणाले की, जसजशी संसाधने वाढतील, तशी ती दिली जाईल. ते म्हणाले, आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत आणि एकदा राज्याचे उत्पन्न वाढले की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यांत कर्जमाफी योजना पुढे नेऊ.
HMPV Virus in India: कर्नाटकात मानवी मेटान्यूमोव्हायरसचे दोन रुग्ण आढळले, आरोग्य मंत्रालयाची पुष्टी
Shreya Varkeइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कर्नाटकात ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन रुग्ण शोधून काढले आहेत. देशभरात श्वसनाच्या अनेक विषाणूजन्य रोगजनकांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियमित देखरेखीदरम्यान ही प्रकरणे समोर आली आहेत.
Sex Racket Bust in Bhopal: वेश्याव्यवसाय करणाऱ्या 18 स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकले छापे, ६८ जणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले
Shreya Varkeगुप्त माहितीच्या आधारे भोपाळ पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या शहरातील १८ स्पा सेंटरवर अचानक छापे टाकले. २५० अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईत ३५ महिलांसह ६८ जणांना ताब्यात घेण्यात आले, जे आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले. कमला नगर, एमपी नगर, हबीबगंज आणि बाग सेवानिया या आस्थापनांमध्ये अनैतिक कारवाया होत असल्याच्या अनेक तक्रारींनंतर या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
Infosys Salary Hike Deferred: इन्फोसिसने वार्षिक पगारवाढ FY25 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलली; नोव्हेंबर 2023 मध्ये वाढला होता शेवटचा पगार
टीम लेटेस्टलीपगारवाढ नसतानाही डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचे मार्जिन कमी होईल, असे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या प्री-अर्निंग नोटमध्ये म्हटले आहे. सुट्ट्यांमुळे कामाचे दिवस कमी असल्याने असे होणार आहे.
Kaithal Shocker: कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले, दोघांची प्रकृती चिंताजनक; ही घटना सीसीटीव्हीत कैद
Shreya Varkeहरियाणातील कैथल जिल्ह्यात एका व्यक्तीने कारमध्ये पाच जणांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिका धान्य बाजारात शनिवारी ही घटना घडली. जिथे कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच तरुणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना अवघ्या 5 सेकंदात घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
1st Case of HMPV in India: चीनमध्ये कहर करणाऱ्या एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसचा भारतात प्रवेश; बंगळुरू येथील 8 महिन्यांच्या बाळाला झाली लागण
Prashant Joshiएचएमपीव्ही मुख्यतः मुले आणि वृद्धांना लक्ष्य करतो. चीनमध्ये हा विषाणू प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून आला आहे. त्याची लक्षणे कोरोना सारखीच आहेत. यामध्ये सर्दी-खोकला यांचाही समावेश आहे.
Digital Scam: लोकप्रिय युट्युबर Ankush Bahuguna ठरला सायबर फसवणुकीचा शिकार; 40 तास होता डिजिटल अरेस्टमध्ये, सोशल मिडियाद्वारे शेअर केली घटना (VIDEO)
Prashant Joshiअंकुशच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्यामुळे त्याचे पैसे तर गेलेच मात्र, मानसिक आरोग्याचे नुकसान झाले. आता डिजिटल अटक घोटाळ्याचा बळी ठरलेला अंकुश लोकांना जागरुक करत आहे, जेणेकरून त्याच्यासारखा दुसरा कोणी या घोटाळ्याला बळी पडू नये.
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeदिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुलींमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दोन मुलींमधील वाद इतका वाढला की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भांडणादरम्यान एका मुलीने दुसऱ्या मुलीचे केस पकडून ओढले.
NCB Seizes Fake Drug Pills and Cigarettes: मुंबईमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले 74,000 अवैध कॅप्सूल, 2.4 लाख बनावट सिगारेट
Prashant Joshiजप्त केलेले सामान संशयास्पद नसलेले खाद्यपदार्थ आणि इतर पिशव्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्यांची चौकशी सुरू आहे.
Guru Gobind Singh Jayanti 2025: गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या, त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल
Shreya Varkeशिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग हे केवळ धर्मगुरूच नव्हते तर एक महान योद्धा, कवी आणि थोर विचारवंत होते, त्यामुळे शिखांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा आणि आदर आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माला बळकटी देण्याबरोबरच लोकांना सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. 6 जानेवारी 2025 रोजी गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल..
Weather Forecast: कसे असेल आजचे हवामान? जाणुन घ्या, हवामान खात्याचा अंदाज
Shreya Varkeकडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पुढील दोन-तीन दिवस दाट धुक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्येही 6 जानेवारीला दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 06 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 06 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
South Africa vs Pakistan, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका, शान मसूदने दुसऱ्या डावात झळकावले नाबाद शतक
Amol Moreतिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात 49 षटकांत एक गडी गमावून 213 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिली विकेट घेत 205 धावा फलकावर लावल्या.
Sanjay Gaikwad Viral Video: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; मतदारांना जाहीर शिवीगाळ
Amol Moreविधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड हे विजयी झाले. पण हा विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण ते अगदी काठावर निवडून आले आहेत. त्यांनी निसटत्या विजयाची नोंद केली. अवघ्या 800 मतांनी ते विजयी झाले.
Virat Kohli Test Stats In Last 5 Years: विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी, पाहा गेल्या 5 वर्षांची आकडेवारी
Amol More2011 साली पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीची सरासरी सातत्याने घसरत आहे. एकेकाळी ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट कोहली आता 45 च्या जवळ पोहोचला आहे. 123 कसोटी सामने खेळणाऱ्या विराट कोहलीने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत.
South Africa vs Pakistan, 2nd Test Day 3 Scorecard: पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 194 धावांवर आटोपला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दिला फॉलोऑन
Amol Moreदुसऱ्या डावात पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तानने बिनबाद 135 धावा या केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद हा 68 तर बाबर आझम हा 54 धावांवर खेळत आहे.