NCB Seizes Fake Drug Pills and Cigarettes: मुंबईमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले 74,000 अवैध कॅप्सूल, 2.4 लाख बनावट सिगारेट

जप्त केलेले सामान संशयास्पद नसलेले खाद्यपदार्थ आणि इतर पिशव्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्यांची चौकशी सुरू आहे.

NCB | File Image

NCB Seizes Fake Drug Pills and Cigarettes: मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 3 जानेवारी रोजी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान, मुंबई विमानतळ एअर कार्गो टर्मिनलवर बेकायदेशीरपणे वळवलेल्या फार्मास्युटिकल ड्रग्सच्या 74,000 कॅप्सूल (Illicit Capsules) आणि 244,400 सिगारेट (Cigarette) जप्त केल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबीच्या मुंबई युनिटला एका आंतरराष्ट्रीय टोळीची माहिती मिळाली होती, जी भारतातून बेकायदेशीरपणे औषधे खरेदी करत होती आणि ती परदेशी ग्राहकांना पुरवत होती. या माहितीची खात्री केल्यानंतर, एजन्सीने लॉजिस्टिक कंपनीच्या दोन कंटेनरचा माग काढला आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर थांबवले.

पथकाने शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या कारवाईत कंटेनरची झडती घेतल्यानंतर अवैधरित्या तस्करी केलेल्या औषधांच्या 74,000 कॅप्सूल आणि बनावट ब्रँडच्या 2.44 लाख सिगारेट जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. जप्त करण्यात आलेल्या औषधांची किंमत 75 लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. ही खेप लंडनला पाठवली जाणार होती.

जप्त केलेले सामान संशयास्पद नसलेले खाद्यपदार्थ आणि इतर पिशव्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याआधी मागील वर्षी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने नवी मुंबईत सुमारे 60 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करून, ड्रग्ज टोळीच्या प्रमुख सदस्याला अटक केली होती. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिन योजने'च्या बनावट लाभार्थ्यांची होणार चौकशी, मंत्री आदिती तटकरे)

अधिकाऱ्याने सांगितले की, 26 जून रोजी वाशी येथे ड्रग्ज जप्त केल्यानंतर तपासादरम्यान आरोपी सुफियान खानचे नाव पुढे आले. एनसीबीने ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला जेव्हा त्यांनी 31.5 किलो मेफेड्रोन, सिंथेटिक प्रतिबंधित पदार्थ (अंदाजे 60 कोटी रुपये किमतीचा) जप्त केला आणि मुंबईतील नागपाडा, डोंगरी आणि वडाळा भागातील तिघांना अटक केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now