ठळक बातम्या
Pranab Mukherjee's Memorial: प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर; शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
Bhakti Aghavया मंजुरीवर प्रतिक्रिया देताना माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
Justin Trudeau नंतर कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या Anita Anand; जाणून घ्या त्यांची कारकीर्द
Dipali Nevarekarअनिता आनंदचा जन्म Nova Scotia मधील Kentville येथे झाला. त्यांची आई सरोज डी. राम आणि वडील एस.व्ही. (अँडी) आनंद हे दोघेही भारतीय physicians आहेत.
Vande Bharat Express आता -10 अंश सेल्सिअस तापमानात पर्वत आणि बर्फाळ भागातून धावणार; हिमवर्षावाचा देखील होणार नाही परिणाम
Bhakti Aghavआता वंदे भारत ट्रेन लवकरच पहिल्यांदाच डोंगरात वेगाने धावताना दिसणार आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी (Snowfall) मुळे रेल्वेची सुविधा फारच कमी आहे. मात्र, आता रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस पर्वतांवर चालवण्याची तयारी करत आहे.
Udit Narayan Building Catches Fire: गायक उदित नारायण यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavउदित नारायण यांच्या स्कायपॅन इमारतीला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. इमारतीतील एक अपार्टमेंट आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तथापी, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला.
Man Arrested in Ayodhya Ram Mandir for wearing 'Glasses': अयोध्या राम मंदिर मध्ये तरूणाला अटक; चष्म्यातील खास कॅमेर्यातून टिपत होता फोटो
Dipali Nevarekarअयोध्या राम मंदिरामध्ये सध्या मोबाईल फोन आणि कॅमेर्यावर बंदी आहे.
Mobile Phones Banned In Pench-Nagzira: पेंच, नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर बंदी; वनविभागाने का घेतला निर्णय? जाणून घ्या
Bhakti Aghavपेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve), नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (Navegaon-Nagzira Tiger Reserve) पर्यटक, मार्गदर्शक आणि वाहनचालकांसाठी वनविभागाने मोबाइल फोनवर बंदी (Mobile Phones Banned) लागू केली आहे.
Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज मधील महाकुंभ मेळा यंदा कधी सुरू होणार? कधी संपणार? जाणून घ्या शाहीस्नानाच्या 6 तारखा
Dipali Nevarekarप्रयागराज मधील महाकुंभ मेळा 2025 ची सुरूवात जानेवारी 13, 2025 पासून होणार असून त्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 दिवशी होणार आहे. हा महाकुंभमेळा 45 दिवसांचा आहे.
Rabbit Fever: रॅबीट फिवर म्हणजेच 'ससा ताप' ही भानगड काय? Tularemia आजाराबद्दलही घ्या जणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWhat Is Tularemia: ससा ताप (तुलारेमिया) त्याची चिन्हे, कारणे आणि प्रतिबंधात्मक माहिती जाणून घ्या. ज्यामुळे या दुर्मिळ आजारापासून स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण कसे करावे याबद्दल आपण व्हाल सजग.
Human Metapneumovirus: पुण्यात 'ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस'बाबत PMC ॲक्शन मोडमध्ये; नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखीव
Prashant Joshiनागरी संस्थेने नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात तातडीने 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखून ठेवला आहे. मात्र, पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही, ज्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रसाराची चिंता निर्माण झाली आहे.
LPG Connections in India: घरगुती एलपीजी कनेक्शनच्या संख्येत दुप्पट वाढ; 10 वर्षांत वापरकर्ते 32.83 कोटींच्या पार
टीम लेटेस्टलीदेशातील घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या गेल्या 10 वर्षांत दुप्पट होऊन 32.83 कोटी झाली आहे. 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत ची आकडेवारी समोर आली आहे. जी 2014 मध्ये 14.52 कोटी होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली.
Vande Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! शेगाव, वडोदरासह 4 नवीन मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन्स, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiहे नव्याने जोडलेले मार्ग प्रवासाच्या वेळेत कमालीची घट आणि प्रवाशांना अधिक सुविधा देणारे आहेत. या अतिरिक्त वंदे भारत गाड्या सुरू केल्याने पुणेकरांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल. या मार्गांमुळे जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी आरामदायी आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल.
Thief Kisses Woman In Malad: चोरी करायला गेला, पण महिलेचा मुका घेऊन आला; मालाड येथील घटना, आरोपीला अटक
Bhakti Aghavचोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरात घुसले. मात्र, परिसरात झडती घेतल्यानंतर त्यांना घरात कोणतीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्याने चक्क घरातील महिलेचे चुंबण घेतले.
PRS vs MLR BBL 2024-25 Scorecard: पर्थ स्कॉचर्सने मेलबर्न रेनेगेड्स पुढे ठेवले 148 धावांचे लक्ष्य; ॲश्टन अगरचे शानदार अर्धशतक झळकावले, स्कोअरकार्ड पहा
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थमधील पर्थ स्टेडियमवर पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सने 8 गडी गमावून 147 धावा केल्या.
Mumbai Torres Jewellers Fraud: Tausif Reyaz आणि Abhishek Gupta ने छापा घालून टोरेसला लुटले, कंपनीने CEO ला ठरवलं जबाबदार; इथे पहा जारी स्टेटमेंट
Dipali Nevarekarआता कंपनीने स्टेंटमेंट जारी करत Tausif Reyaz आणि Abhishek Gupta ने छापा घालून टोरेसला लुटले असल्याचं म्हटलं आहे.
Tibet Earthquake: तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर चीनच्या वादग्रस्त धरण प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
Shreya Varkeतिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमधील भूकंपामुळे या भागात मोठे धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चायना भूकंप नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट क्षेत्राचे उत्तर प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंगरी या ग्रामीण काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
New Zealand vs Sri Lanka 2nd ODI 2025 Live Streaming: श्रीलंकेला पराभूत करून मालिका जिंकण्याचे न्यूझीलंडचे लक्ष्य; सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamन्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 8 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता खेळवला जाईल.
Man Cuts College Girl's Hair At Dadar Station: दादर स्टेशनवर अज्ञात व्यक्तीने कापले महाविद्यालयीन तरुणीचे केस; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
Bhakti Aghavदादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) सोमवारी एका व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने 2017 च्या 'चोटी कटवा' (Choti Katwa) च्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Thane: बोर्डिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये झालेल्या मारहाणीमुळे पाळीव कुत्र्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली, अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एफआयआर दाखल
Shreya Varkeठाण्यातील पाळीव प्राण्यांच्या बोर्डिंग सेंटरमध्ये दोन पाळीव कुत्र्यांना शिवीगाळ करून जखमी केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 'डॉग्स अँड मी' सेंटरमध्ये आपल्या गोल्डन रिट्रीव्हर आणि टॉय पुडलला मारहाण झाल्याचे पाहून पाळीव प्राण्यांच्या मालकांना धक्का बसला. दोघांना मारहाण करण्यात आली दरम्यान एकाच्या डोळ्याची दृष्टी गेली. या कुत्र्याला बोर्डिंग सेंटरमध्ये नेले असता त्याला भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले. अयोग्य हाताळणी आणि मारहाणीमुळे कुत्र्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली.
Delhi Assembly Election Schedule: दिल्ली विधानसभा निवडणूक वेळापत्रक;5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला मतमोजणी, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनिवडणूक आयोगाने 5 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. महत्त्वाच्या तारखा, मतदारांची आकडेवारी आणि निवडणुकांना आकार देणाऱ्या राजकीय घडामोडींबद्दल घ्या जाणून.
Fastag Mandatory From April 1: महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी आता फास्टटॅग अनिवार्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Dipali NevarekarMinistry of Road Transport & Highways कडून National Electronic Toll Collection program (NETC) लॉन्च करण्यात आले आहे. त्यामध्ये RFID technology द्वारा फास्टटॅगच्या माध्यमातून टोल वसुल केला जातो.