Human Metapneumovirus: पुण्यात 'ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस'बाबत PMC ॲक्शन मोडमध्ये; नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखीव

नागरी संस्थेने नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात तातडीने 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखून ठेवला आहे. मात्र, पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही, ज्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रसाराची चिंता निर्माण झाली आहे.

(Photo Credit- Pixabay)

Human Metapneumovirus in Pune: भारतात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) प्रकरणे आढळल्यानंतर आता, पुणे महानगरपालिकेने (PMC) आपली तयारी वाढवली आहे. या विषाणूसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरी संस्थेने नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात तातडीने 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखून ठेवला आहे. मात्र, पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही, ज्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रसाराची चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून नायडू रुग्णालयात 350 खाटा आरक्षित करण्याचे निर्देश पीएमसीला दिले आहेत. तसेच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पीएमसीच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि साथीच्या रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘पुण्यात एकही केस नाही, मात्र  संसर्ग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पीएमसीने लोकांना शिंकताना किंवा खोकताना आपले नाक आणि तोंड रुमालाने झाकण्याचे आणि आपले हात पूर्णपणे धुण्याचे, थुंकणे टाळण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.’ (हेही वाचा: HMPV Virus in India: कर्नाटक आणि गुजरातपाठोपाठ तामिळनाडूच्या चेन्नई आणि सालेममध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचे आढळले दोन रुग्ण)

Human Metapneumovirus in Pune:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now