Pranab Mukherjee's Memorial: प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर; शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

या मंजुरीवर प्रतिक्रिया देताना माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Sharmistha Mukherjee with PM Modi (फोटो सौजन्य - X/@Sharmistha_GK)

Pranab Mukherjee's Memorial: भारताचे माजी राष्ट्रपती, लेखक दिवंगत प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे स्मारक उभारण्यासाठी राष्ट्रीय स्मृती संकुलात (Rashtriya Smriti) (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास केंद्राने मंगळवारी मंजुरी दिली. या मंजुरीवर प्रतिक्रिया देताना माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची भेट घेतली आणि बाबांचे स्मारक बांधण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाबद्दल मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली. हे सर्व अधिक प्रशंसनीय आहे. कारण आम्ही याची मागणी केली नव्हती. पंतप्रधानांच्या या अनपेक्षित पण खरोखर दयाळू निर्णयाने मी खूप प्रभावित झाले आहे.'

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now