ठळक बातम्या
Oscars 2025: ऑस्कर 2025 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकनासाठी 7 भारतीय चित्रपटांची निवड; जाणून घ्या यादी
Prashant Joshiएकूण 323 चित्रपट शॉर्टलिस्ट केले आहेत. यामध्ये 232 पैकी 207 चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निवडले गेले आहेत. भारतातील शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांमध्ये असे काही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाले आहेत.
Azaad Trailer: अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहून चाहते खूश
Shreya Varkeअजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि बॉलिवूडची कूल टाइम गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. होय, या दोघांचा पहिल्या चित्रपट 'आझाद'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत, तसेच ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असलेल्या डायना पेंटीची ही झलक पाहायला मिळत आहे.
Bharat Mobility Global Expo 2025: दिल्लीत 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणार ऑटो एक्सपो-2025; 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जाणार
Prashant Joshiदेशातील सर्वात मोठ्या मोटर शोमध्ये 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जातील. यासोबतच बॅटरी, टायर आणि इलेक्ट्रॉनिक शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.
Ramgarh Road Accidents: झारखंडच्या रामगडमध्ये भीषण अपघात, चार जण ठार, आठ जखमी
Shreya Varkeझारखंडमधील रामगड जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी मुलांसह चौघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले. जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोला येथील गुडविल मिशन स्कूलची मुले रिक्षाने शाळेत जात असल्याचे सांगण्यात आले. गोला पोलिस ठाण्याच्या तिर्ला चौकाजवळ बटाट्याने भरलेला ट्रक रिक्षावर उलटला. रिक्षातील मुले ट्रकखाली गेली.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहचे केले कौतुक, म्हटले तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज
Amol Moreबुमराहने मालिकेत चमकदार कामगिरी केली, त्याने 13.06 च्या सरासरीने 32 बळी घेतले आणि त्याच्या घातक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला मालिकेत अनेक वेळा त्रास दिला. मालिकेत, बुमराह सिडनी बार्न्सच्या 1911-12 मध्ये ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या एका वेगवान गोलंदाजाच्या मालिकेत 34 बळी घेण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ होता.
Nepal-Tibet Earthquake: नेपाळ-तिबेट भूकंपात १२६ जणांचा मृत्यू, अनेक घरे कोसळली
Shreya Varkeनेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ रिश्टर स्केलतीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून १८८ जण जखमी झाले आहेत. या भूकंपात १००० हून अधिक घरे कोसळली आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा केंद्रबिंदू 28.86 अंश उत्तर अक्षांश आणि 87.51 अंश पूर्व रेखांश 10 किलोमीटर खोलीवर होता. नेपाळच्या सीमेजवळ शिझांग (तिबेट स्वायत्त प्रदेश) असे या ठिकाणाचे नाव आहे.
Actor Ajith Kumar Race Car Accident: सुपरस्टार अजित कुमारच्या गाडीचा रेसिंग ट्रॅकवर अपघात; पहा व्हिडिओ
Amol Moreअजित कुमार हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यासोबतच त्याची रेसिंगची आवडही कौतुकाचा विषय ठरली आहे. सध्या ते तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे,
Mumbai First Case of HMPV: मुंबईत समोर आले एचएमपीव्हीचे पहिले प्रकरण; 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण
Prashant Joshiमुंबईत ज्या मुलीबाबत एचएमपीव्हीचे प्रकरण समोर आले आहे ती फक्त सहा महिन्यांची आहे. माहितीनुसार, 1 जानेवारीला तिला गंभीर खोकला, छाती जड होणे आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Apple Fires Employees: चॅरिटी क्लॉजचा गैरवापर, पगारात फसवणूक; ॲपल कंपनीकडून 185 जणांना डच्चू, भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेApple Layoffs: चॅरीटी क्लॉजचा वापर चुकीच्या पद्धतीने करणे ॲपल कंपनीत काम करणाऱ्या 185 कर्मचाऱ्यांना भोवले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कंपीने कामावरुन काढून टाकले आहे.
New Zealand vs Sri Lanka 2nd ODI 2025: न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर 37 षटकांत 256 धावांचे आव्हान, रचिन रविंद्रची 79 धावांची खेळी; थेक्षानाचे 4 विकेट
Amol Moreदुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात ही चांगली झाली पहिला विकेट हा लवकर गमावल्यानंतरही रचिन रविंद्र आणि मार्क चॅपमॅन यांनी शतकी भागिदारी रचत संघाला एक मजबूत सुरवात करुन दिली.
Florida: कॅनडाला 51 वे राज्य बनवण्यासाठी 'आर्थिक शक्ती'चा वापर करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; ट्रुडो यांनी दिली प्रतिक्रिया
Shreya Varkeअमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि अमेरिकेला एकत्र आणण्यासाठी आर्थिक बळाचा वापर करण्याची ग्वाही दिली आहे. ट्रम्प अनेकदा कॅनडाला '५१ वे राज्य' म्हणून संबोधतात. ट्रम्प यांनी आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ अमेरिकेकडून देण्यात येणारी लष्करी मदत आणि दोन्ही देशांमधील व्यापार तूट अशी कारणे दिली. ट्रम्प यांनी मंगळवारी फ्लोरिडा येथे पत्रकार परिषद घेतली.
Sexual Harassment: महिलेच्या शरीराच्या रचनेवर भाष्य करणे लैंगिक छळ मानले जाईल; Kerala High Court चा मोठा निर्णय
Prashant Joshiन्यायालयाने म्हटले आहे की, स्त्रीच्या ‘शरीराच्या संरचनेवर’ केलेल्या टिप्पण्या लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात आणि तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
India Women vs Ireland Women ODI Stats: असा आहेत टीम इंडिया आणि आयर्लंडमधला एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड, येथे पहा हेड टू हेड आकडेवारी, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू
Amol Moreएकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला आणि आयर्लंड महिला संघ 12 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये भारतीय महिला संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय महिलांनी 12 पैकी 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला एकही विजय मिळालेला नाही.
Hair Loss Outbreak in Maharashtra: भयानक केसगळती, अनेकांना टक्कल, नागरिक हैराण; महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विचित्र आजार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBuldhana Baldness Virus: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांची केसगळती होत असून, त्यांना टक्कल पडत आहे. अनेकांना हा प्रकार दुषीत पाणी आणि विशिष्ट शाम्पू वापरल्याने होत असावा अशी शंका आहे. जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हेक्षण सुरु केले आहे.
Amazon Great Republic Day Sale 2025: येत्या 13 जानेवारीपासून सुरू होणार बहुप्रतीक्षित ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल; कपडे, टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनसह अनेक वस्तू स्वस्तात खरेदीची संधी
Prashant Joshiजर तुम्ही किचन मेकओव्हरची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी किचनशी संबंधित उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये 70% पर्यंत मोठ्या बचतीवर स्वयंपाकघरातील आणि घरगुती उपकरणे खरेदी केली जाऊ शकतात.
Sam Altman Sex Abuse Allegation: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमनवर बहिण Annie Altman ने केले लैंगिक शोषणाचे आरोप; खटला दाखल
Prashant Joshiसोमवारी दाखल केलेल्या दाव्यानुसार, कथित अत्याचाराची सुरुवात ती 3 वर्षांची होती तेव्हा झाली आणि शेवटची घटना कथितपणे घडली जेव्हा सॅम प्रौढ होते, परंतु त्यांची बहीण अल्पवयीन होती. ॲन ऑल्टमनने यापूर्वी सोशल मीडियावर दावा केला होता की सॅम ऑल्टमनने तिच्यावर अत्याचार केले आहेत
ISRO New Chief V. Narayanan: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी नारायणन यांची नियुक्ती , उद्यापासुन स्विकारणार पदभार
Shreya Varkeनारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी नियुक्ती ची घोषणा ९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून ते जानेवारी 2022 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे एस. सोमनाथ यांची जागा घेतील. सुमारे चार दशकांचा अनुभव आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानासह नारायणन यांच्या नियुक्तीमुळे भारतीय अंतराळ कार्यक्रमाला नवी दिशा आणि गती मिळाली आहे. व्ही. नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ असून भारताच्या अंतराळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग; अनेक घरे जाळून खाक, 30 हजार लोकांना बाहेर काढण्याची तयारी
Prashant Joshiया भीषण आगीमुळे रस्ते ठप्प झाल्याने मोठ्या संख्येने लोक आपल्या गाड्या सोडून पायी सुरक्षित ठिकाणी जात आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वाढली आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली. अधिका-यांनी या आगीत किती वास्तूंचे नुकसान झाले किंवा नष्ट झाले याची नेमकी संख्या जाहीर केली नाही.
How to Increase Ladki Bahin Yojana Money? लाडकी बहीण योजना, आलेले पैसे कसे वाढवाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHow to Grow Wealth: लाडकी बहीण योजना मिळवून देत असलेल्या 1500 रुपयांच्या लाभातून तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. अनेकांना हे अशक्य वाटू शकते पण तुम्ही हे शक्य करु शकता. फक्त त्यासाठी योग्य ज्ञान, माहिती आणि शहाणपण आवश्यक आहे. पैसे कसे वाढवायचे? घ्या जाणून.
Cashless Treatment Scheme: रस्ते अपघातातील जखमींना मिळणार दीड लाख रुपयांची मोफत 'कॅशलेस' उपचार सुविधा; Nitin Gadkari यांनी जाहीर केली योजना, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiगडकरींच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये हा कॅशलेस प्रकल्प पायलट केला होता. यामध्ये योजनेत काही कमतरता आढळल्या. त्यात आता सुधारणा केल्या जात आहेत. सरकार यावर्षी मार्चपर्यंत सुधारित योजना आणणार आहे.