Azaad Trailer: अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहून चाहते खूश
अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि बॉलिवूडची कूल टाइम गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. होय, या दोघांचा पहिल्या चित्रपट 'आझाद'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत, तसेच ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असलेल्या डायना पेंटीची ही झलक पाहायला मिळत आहे.
Azaad Trailer: अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि बॉलिवूडची कूल टाइम गर्ल रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच पडद्यावर झळकणार आहेत. होय, या दोघांचा पहिल्या चित्रपट 'आझाद'चा मोस्ट अवेटेड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमन देवगण आणि राशा थडानी ची जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत, तसेच ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असलेल्या डायना पेंटीची ही झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा एका कुशल घोडेस्वाराची आहे, ज्याची भूमिका अजय देवगणने साकारली आहे, जो क्रूर ब्रिटिश सैन्याच्या तावडीतून सुटतो. त्यानंतर चित्रपटाचे कथानक अधिक खोल वर जाते, तेवढ्यात त्याचा घोडा बेपत्ता होतो. या चित्रपटात रवीनाची मुलगी राशा थडानीची स्टाईल आणि अमनचा दमदार अभिनय यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरचा हा चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येथे पाहा,चित्रपटाचा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)