Sexual Harassment: महिलेच्या शरीराच्या रचनेवर भाष्य करणे लैंगिक छळ मानले जाईल; Kerala High Court चा मोठा निर्णय
न्यायालयाने म्हटले आहे की, स्त्रीच्या ‘शरीराच्या संरचनेवर’ केलेल्या टिप्पण्या लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात आणि तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
केरळ उच्च न्यायालयाने महिलांच्या शारिरीक रचनेवर केलेल्या टिप्पणीला लैंगिक छळ असल्याचे म्हटले आहे. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए बद्रुद्दीन यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, अशी टिप्पणी लैंगिक छळाचा गुन्हा मानून घेऊन कारवाई करावी. केरळ राज्य विद्युत मंडळाच्या (केएसईबी) माजी कर्मचाऱ्यावर त्याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केले होते. महिलेने सांगितले होते की, आरोपी माजी कर्मचाऱ्याने 2013 पासून तिच्याविरुद्ध अपशब्द वापरले. यानंतर 2016-17 मध्ये त्याने आक्षेपार्ह मेसेज आणि व्हॉईस कॉल्स पाठवण्यास सुरुवात केली. केएसईबी आणि पोलिसांकडे तक्रार करूनही तो तिला आक्षेपार्ह संदेश पाठवत होता. अनेक तक्रारींनंतर, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यानंतर लैंगिक छळाचा खटला रद्द करण्यात यावा यासाठी आरोपीने याचिका दाखल केली.
यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, स्त्रीच्या ‘शरीराच्या संरचनेवर’ केलेल्या टिप्पण्या लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात आणि तो दंडनीय गुन्हा मानला जाईल. केरळ हायकोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सांगितले की, आरोपीचे संदेश आणि टिप्पण्यांमध्ये लैंगिक छळाचे सर्व घटक आहेत. महिलेच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा अपमान करण्याचा हेतू स्पष्ट होता आणि तो गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा: Kerala Shocker: केरळमध्ये 11वीच्या विद्यार्थिनीवर शिकवणी शिक्षकाकडून बलात्कार; न्यायालयाने सुनावली 111 वर्षांची शिक्षा)
Sexual Harassment Case:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)