ठळक बातम्या

New Zealand vs Sri Lanka 2nd ODI 2025: न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर 37 षटकांत 256 धावांचे आव्हान, रचिन रविंद्रची 79 धावांची खेळी; थेक्षानाचे 4 विकेट

Amol More

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात ही चांगली झाली पहिला विकेट हा लवकर गमावल्यानंतरही रचिन रविंद्र आणि मार्क चॅपमॅन यांनी शतकी भागिदारी रचत संघाला एक मजबूत सुरवात करुन दिली.

Florida: कॅनडाला 51 वे राज्य बनवण्यासाठी 'आर्थिक शक्ती'चा वापर करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; ट्रुडो यांनी दिली प्रतिक्रिया

Shreya Varke

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि अमेरिकेला एकत्र आणण्यासाठी आर्थिक बळाचा वापर करण्याची ग्वाही दिली आहे. ट्रम्प अनेकदा कॅनडाला '५१ वे राज्य' म्हणून संबोधतात. ट्रम्प यांनी आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ अमेरिकेकडून देण्यात येणारी लष्करी मदत आणि दोन्ही देशांमधील व्यापार तूट अशी कारणे दिली. ट्रम्प यांनी मंगळवारी फ्लोरिडा येथे पत्रकार परिषद घेतली.

Sexual Harassment: महिलेच्या शरीराच्या रचनेवर भाष्य करणे लैंगिक छळ मानले जाईल; Kerala High Court चा मोठा निर्णय

Prashant Joshi

न्यायालयाने म्हटले आहे की, स्त्रीच्या ‘शरीराच्या संरचनेवर’ केलेल्या टिप्पण्या लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात आणि तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

India Women vs Ireland Women ODI Stats: असा आहेत टीम इंडिया आणि आयर्लंडमधला एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड, येथे पहा हेड टू हेड आकडेवारी, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Amol More

एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला आणि आयर्लंड महिला संघ 12 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये भारतीय महिला संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय महिलांनी 12 पैकी 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला एकही विजय मिळालेला नाही.

Advertisement

Hair Loss Outbreak in Maharashtra: भयानक केसगळती, अनेकांना टक्कल, नागरिक हैराण; महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विचित्र आजार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Buldhana Baldness Virus: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांची केसगळती होत असून, त्यांना टक्कल पडत आहे. अनेकांना हा प्रकार दुषीत पाणी आणि विशिष्ट शाम्पू वापरल्याने होत असावा अशी शंका आहे. जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने सर्व्हेक्षण सुरु केले आहे.

Amazon Great Republic Day Sale 2025: येत्या 13 जानेवारीपासून सुरू होणार बहुप्रतीक्षित ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल; कपडे, टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनसह अनेक वस्तू स्वस्तात खरेदीची संधी

Prashant Joshi

जर तुम्ही किचन मेकओव्हरची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी किचनशी संबंधित उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये 70% पर्यंत मोठ्या बचतीवर स्वयंपाकघरातील आणि घरगुती उपकरणे खरेदी केली जाऊ शकतात.

Sam Altman Sex Abuse Allegation: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमनवर बहिण Annie Altman ने केले लैंगिक शोषणाचे आरोप; खटला दाखल

Prashant Joshi

सोमवारी दाखल केलेल्या दाव्यानुसार, कथित अत्याचाराची सुरुवात ती 3 वर्षांची होती तेव्हा झाली आणि शेवटची घटना कथितपणे घडली जेव्हा सॅम प्रौढ होते, परंतु त्यांची बहीण अल्पवयीन होती. ॲन ऑल्टमनने यापूर्वी सोशल मीडियावर दावा केला होता की सॅम ऑल्टमनने तिच्यावर अत्याचार केले आहेत

ISRO New Chief V. Narayanan: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी नारायणन यांची नियुक्ती , उद्यापासुन स्विकारणार पदभार

Shreya Varke

नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी नियुक्ती ची घोषणा ९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 14 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून ते जानेवारी 2022 मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे एस. सोमनाथ यांची जागा घेतील. सुमारे चार दशकांचा अनुभव आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानासह नारायणन यांच्या नियुक्तीमुळे भारतीय अंतराळ कार्यक्रमाला नवी दिशा आणि गती मिळाली आहे. व्ही. नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ असून भारताच्या अंतराळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.

Advertisement

Los Angeles Wildfire: लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग; अनेक घरे जाळून खाक, 30 हजार लोकांना बाहेर काढण्याची तयारी

Prashant Joshi

या भीषण आगीमुळे रस्ते ठप्प झाल्याने मोठ्या संख्येने लोक आपल्या गाड्या सोडून पायी सुरक्षित ठिकाणी जात आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी वाढली आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली. अधिका-यांनी या आगीत किती वास्तूंचे नुकसान झाले किंवा नष्ट झाले याची नेमकी संख्या जाहीर केली नाही.

How to Increase Ladki Bahin Yojana Money? लाडकी बहीण योजना, आलेले पैसे कसे वाढवाल? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

How to Grow Wealth: लाडकी बहीण योजना मिळवून देत असलेल्या 1500 रुपयांच्या लाभातून तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. अनेकांना हे अशक्य वाटू शकते पण तुम्ही हे शक्य करु शकता. फक्त त्यासाठी योग्य ज्ञान, माहिती आणि शहाणपण आवश्यक आहे. पैसे कसे वाढवायचे? घ्या जाणून.

Cashless Treatment Scheme: रस्ते अपघातातील जखमींना मिळणार दीड लाख रुपयांची मोफत 'कॅशलेस' उपचार सुविधा; Nitin Gadkari यांनी जाहीर केली योजना, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

गडकरींच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये हा कॅशलेस प्रकल्प पायलट केला होता. यामध्ये योजनेत काही कमतरता आढळल्या. त्यात आता सुधारणा केल्या जात आहेत. सरकार यावर्षी मार्चपर्यंत सुधारित योजना आणणार आहे.

Lim Kimya Shot Dead: कंबोडियाचे विरोधी पक्षनेते लिम किम्या यांची बँकॉक येथे गोळ्या घालून हत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कंबोडियाचे माजी विरोधी पक्ष खासदार लिम किम्या यांची बँकॉकमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दडपशाहीबद्दल चिंता वाढवत या हल्ल्याला राजकीय हत्या म्हणून लेबल केले जात आहे.

Advertisement

Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित

Prashant Joshi

टॉरेस कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईत ऑपरेशन सुरू केले. त्यांनी दादरमध्ये फ्लॅगशिप शोरूम आणि नवी मुंबई, कल्याण, बोरिवली आणि मीरा रोड येथे शाखा उघडल्या. लोकांची फसवणूक करण्यासाठी कंपनीने एक आकर्षक गुंतवणूक योजना ऑफर केली. यामध्ये 6% चा साप्ताहिक परतावा आणि 52 आठवड्यांत गुंतवणुकीच्या मूल्याच्या तिप्पट रक्कम देण्याचे वचन दिले होते.

Mumbai Weather Forecast and AQI Today: मुंबईचे तापमान आणि एक्यूआय काय? जाणून घ्या आजचा हवमान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई शहरातील हवामन हलके राहील असे आयएमडीने म्हटले असले तरी, हवा गुणवत्ता निर्देशांक मात्र अद्यापही खालावलेलाच आहे. परिणामी तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेबद्दल तपशील घ्या जाणून.

Australia Plane Crash: रॉटनेस्ट बेटावरून उड्डाणा दरम्यान सी-प्लेन कोसळले, 3 जखमी, 3 बेपत्ता, बचावकार्य सुरू (पाहा फोटो आणि व्हिडिओ)

Shreya Varke

ऑस्ट्रेलियन पर्यटन बेटावर सी-प्लेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन जण बेपत्ता आहेत. रॉटनेस्ट बेटावरून मंगळवारी दुपारी उड्डाणा दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर सेसना २०८ कारवांमधील सात जणांपैकी केवळ एकाला कोणतीही इजा न होता वाचविण्यात यश आले. स्वान रिव्हर सीप्लेन्सच्या मालकीचे हे विमान रॉटनेस्ट बेटापासून ३० किलोमीटर पूर्वेस पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी पर्थ येथील तळावर परतत होते.

Weather Forecast Today, January 8: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबादमध्ये कसे असेल आजचे हवामान, जाणुन घ्या, संपुर्ण माहिती

Shreya Varke

हवामान अंदाज वर्तवणाऱ्या 'विंडी' या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज, ८ जानेवारी रोजी मुंबई आणि दिल्लीतील हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे २१ ते २६ अंश सेल्सिअस आणि ११ ते १८ अंश सेल्सिअस तापमान ाची नोंद राहिल. दुसरीकडे, चेन्नईमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात 0.4 ते 1 मिमी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Suresh Dhas On Resignation Of Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अद्याप चर्चा नाही - सुरेश धस यांची माहिती

Dipali Nevarekar

जो पर्यंत धनंजय मुंडे यांचा संबंध समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्याची चर्चा झाली नसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.

Baba Siddique Murder Case: झीशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून दाखल चार्जशीट वर नाराज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट

Dipali Nevarekar

झिशान ने मीडीयाशी बोलताना अद्याप त्याला चार्जशीट मिळाली नाही पण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांवरील वादाशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाकारल्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video)

Dipali Nevarekar

आरोपी कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मीडीयाला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

Nagpur Couple Suicide Case: नागपूर मध्ये दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 'वेडिंग ड्रेस' मध्ये आत्महत्या; अंत्यविधीसाठी 75 हजार ठेवले बाजूला

Dipali Nevarekar

टोनी आणि अ‍ॅनी नैराश्यात असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. त्यांची समजूत काढण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला होता पण त्यांनी सारी पूर्ण विचार करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सारेच हळहळले आहेत.

Advertisement
Advertisement