ठळक बातम्या
FIR Against Rahul Gandhi In Assam: आसाममध्ये राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल; 'इंडियन स्टेट'शी लढण्याच्या विधानावरून कारवाई
Bhakti Aghavकाही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता ते भाजप, आरएसएस आणि भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीतील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
U19 Women's World Cup 2025: टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने केला पराभव, टी20 विश्वचषकाची विजयाने केली सुरुवात
Amol Moreनिक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. भारताकडून जोशिता व्हीजे, आयुषी शुक्ला आणि सानिका चालके यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्यासोबत जी कमलिनी आणि पारुनिका सिसोदिया यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
Beed Road Accident: बीड-परळी रस्त्यावर पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 5 उमेदवारांना ST Bus ची धडक; 3 ठार, 2 गंभीर जखमी
Bhakti Aghavबीड-परळी रस्त्यावर (Beed-Parli Road) घोडका राजुरी फाटाजवळ (Ghodka Rajuri Phata) झालेल्या एका अपघातात (Accident) तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले.
Israel-Hamas Ceasefire In Gaza: गाझामध्ये इस्रायल-हमास युद्धबंदी लागू; पंतप्रधान नेतन्याहू यांनी केली घोषणा
Bhakti Aghavबेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी सांगितले की, हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी मिळेपर्यंत गाझामधील युद्धबंदी लागू होणार नाही. यानंतर, आता हमासने यादी सादर केली आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8:30 वाजता युद्धबंदी लागू होण्याच्या एक तास आधी त्यांनी एका निवेदनात पुन्हा एकदा इशारा दिला.
Virat Kohli New Milestone: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीकडे एक अनोखा विक्रम रचण्याची सुवर्णसंधी
Amol Moreस्टार फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 36 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात विराट कोहलीने 1340 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, विराट कोहली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.
Bengaluru Cyber Scam: बंगळुरु येथे सायबर फसवणूक, तंत्रज्ञानस 11 कोटी रुपयांस गंडा, तिघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTech Industry Fraud: सायबर फसवणूक करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांची वेशभूषा करून अटकेची धमकी दिल्यानंतर एका तंत्रज्ञान व्यावसायिकाला सायबर घोटाळ्यात 11 कोटी रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.
Hyderabad: "एका केळाची किंमत 100 रुपये"; हैदराबादमध्ये फळ विक्रेत्याचा परदेशी व्लॉगरकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न (Video)
Jyoti Kadamहैदराबादमधून फळ विक्रेत्याने एका परदेशी व्लॉगरची फसवून केल्याची घटना समोर आली आहे. पैसे उकळण्यासाठी त्याने एक केळ शंभर रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला.
Bigg Boss 18 Finale: 'बिग बॉस 18' चा विजेता ट्रॉफीसोबत किती बक्षीस रक्कम जिंकणार, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या
Amol Moreआज टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 18' चा ग्रँड फिनाले आहे. या शोच्या अंतिम फेरीत 6 स्पर्धक पोहोचले आहेत. या यादीत विवियन डिसेना, एशा सिंग, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे.
Fire At Mahakumbh in Prayagraj: प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhakti Aghavस्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत.
'Bought iPhone from Begging': भिकेच्या पैशातून खरेदी केला 16 प्रो मॅक्स; अजमेरमधील भिकाऱ्याने सर्वांना केले चकीत (Watch Video)
Jyoti Kadamअजमेरमधून सगळ्यांना चकीत करणारीबाब समोर आली आहे. भिकाऱ्याने जमा झालेल्या 13लाख रुपयांतून आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Leopard Attack In Gir: गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; तर दुसरा गंभीर जखमी
Bhakti Aghavबिबट्याच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक जण गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर, बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shakib Al Hasan Arrest Warrant: शाकिबविरुद्ध अटक वॉरंट जारी, लवकरच तुरुंगात जाणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Amol Moreशाकिबविरुद्ध चेक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, ढाका न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. क्रिकबझच्या वृत्तानुसार, शाकिब आणि इतर तिघांविरुद्ध खटला सुरू आहे. त्याला दोन वेगवेगळ्या धनादेशांद्वारे सुमारे 4 कोटी 14 लाख बांगलादेशी टाका मिळण्यात अपयश आले.
Hair Loss, Baldness vs. Alopecia: अलोपेसिया आणि केस गळणे, टक्कल पडणे यांमध्ये फरक काय? त्याचे प्रकार आणि उपचार यांबातब घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअलोपेसिया (Alopecia) आणि केस गळणे (Hair Loss) यातील फरक, त्यांची कारणे, प्रकार आणि उपचार पर्याय जाणून घ्या. केस गळती प्रभावीपणे रोखण्यासाठी आहार टिपा आणि उपाय घ्या जाणून.
Maha Kumbh 2025: महाकुंभ 2025च्या 7 व्या दिवसापर्यंत 17 लाखाहून अधिक भाविकांचे त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान
Jyoti Kadamउत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी 17 लाखाहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली. महाकुंभाच्या सातव्या दिवशी, त्रिवेणी संगम येथे 7.02 लाख भाविकांनी सकाळी 8 वाजेपर्यंत पवित्र स्नान केले.
PAK vs WI 1st Test 2025 Day 3 Scorecard: मुलतान कसोटीत पाकिस्तानचा शानदार विजय, वेस्ट इंडिजचा 127 धावांनी केला पराभव; फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व
Nitin Kurheपहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 127 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने पहिल्या डावात 230 धावा केल्या, तर वेस्ट इंडिजचा संघ फक्त 137 धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 157 धावा केल्या, त्यानंतर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 251 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु वेस्ट इंडिजला फक्त 123 धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला.
Champions Trophy 2025: गद्दाफी स्टेडियमवर सीट, मोठी स्क्रीन नाही... अंतिम मुदततीत 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ, PCB करेल का सर्व काम पुर्ण?
Amol Moreगद्दाफी स्टेडियम हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) मोठी डोकेदुखी बनले आहे. येथील नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 25 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. पण खरा प्रश्न असा आहे की: पीसीबी या तारखेपर्यंत काम पूर्ण करू शकेल का? कारण ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करून ICC कडे सोपवायचे आहे.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Bhakti Aghavअभिनेत्यावर 17 जानेवारी रोजी पहाटे 2:00 वाजता त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला करण्यात आला. नंतर त्याला पहाटे 3:00 वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.
ICC Champions Trophy 2025: विश्वचषकानंतर हे 3 भारतीय पहिल्यांदाच खेळणार एकदिवसीय सामना, इंग्लंड मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणार
Nitin Kurhe2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेले नसलेले काही भारतीय खेळाडू देखील आहेत. आता ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आणि नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही विश्वचषकानंतरची दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा आहे.
Rohit Sharma Ranji Return: देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिटमॅन 10 वर्षांनी परतणार, रोहित 'या' संघाविरुद्ध खेळणार
टीम लेटेस्टलीशनिवारी बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी, देशांतर्गत सामन्यांमध्ये स्टार खेळाडूंच्या सहभागाबाबत त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कॅलेंडरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना वेळ काढणे कठीण आहे.
Goa Paragliding Accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू; ऑपरेटरनेही गमावला जीव
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. गोवा पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून तरुणीचे नाव शिवानी डबले (वय, 27) आणि ऑपरेटर सुमन नेपाली (वय, 26) अशी त्यांची नावे आहेत. शिवानी डबले आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला आली होती.