FIR Against Rahul Gandhi In Assam: आसाममध्ये राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल; 'इंडियन स्टेट'शी लढण्याच्या विधानावरून कारवाई

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता ते भाजप, आरएसएस आणि भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीतील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit - X)

FIR Against Rahul Gandhi In Assam: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राहुल यांच्या अलीकडील विधानाबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता ते भाजप, आरएसएस आणि भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीतील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये राहुल गांधी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी 15 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कोटला रोड येथील काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हे विधान केले होते. बीएनएसच्या कलम 152 आणि 197(1)डी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका -

यात एफआयआरमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणारे कृत्य केले आहे, जे एक दखलपात्र आणि अजामीनपात्र कृत्य आहे. तक्रारदार मोनजीत चेतिया यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी यांच्या विधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. (हेही वाचा - Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर)

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशात अशांतता आणि फुटीरतावादी भावना भडकू शकतात, असा दावा चेतिया यांनी केला. तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, राहुल यांनी आपला लढा भारतीय राज्याविरुद्ध असल्याचे सांगून, हे स्पष्ट होते की त्यांना जाणूनबुजून जनतेमध्ये बंडखोरी भडकवायची आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य वारंवार निवडणूक अपयशामुळे झालेल्या निराशेचे परिणाम होते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधीजींवर लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास राखण्याची जबाबदारी होती. परंतु, त्याऐवजी त्यांनी खोटेपणा पसरवण्यासाठी आणि बंडखोरी भडकवण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले. (हेही वाचा - Rahul Gandhi in Parbhani: राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट, पहा व्हिडिओ)

राहुल गांधीविरोधात कारवाईची मागणी -

दरम्यान, म्हटले आहे की लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर, राहुल आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरुद्ध असंतोष भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांचे वक्तव्य भारतीय राज्याच्या अखंडतेला आणि स्थिरतेला थेट आव्हान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर बीएनएसच्या कलम 152 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now