ठळक बातम्या

Delhi New CM Rekha Gupta: जाणून घ्या कोण आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता; उद्या रामलीला मैदानावर पार पडणार शपथविधी समारंभ

Prashant Joshi

रेखा गुप्ता यांच्या राजकीय प्रवासात, त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्यांच्या माध्यमातून पक्षात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. मुख्यमंत्री म्हणून, त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या विकासासाठी नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

Cancer Vaccine For Women: देशातील 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना मिळणार कर्करोगाची लस; येत्या पाच ते सहा महिन्यांत होणार उपलब्ध

Prashant Joshi

आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव म्हणाले की, या लसीवरील संशोधन जवळपास पूर्ण झाले असून त्याची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असून या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे.

Wayanad Shocker: जिममध्ये व्यायाम करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, केरळ येथील घटना

Shreya Varke

अंबलावायल येथील एका जिममध्ये व्यायाम करताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृताचे नाव सलमान असे आहे, तो कुप्पक्कोली येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री तो व्यायाम करत असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सलमानला उपचारासाठी अंबलावायल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तो व्हेंटिलेटरवर होता.

Aashram 3 Part 2 Trailer Release: पम्मी आश्रमाची सूत्रे घेणार हाती, आश्रमच्या कथेत नवे वळण, सीझन 3 पार्ट 2' चा ट्रेलर आज प्रदर्शित

Shreya Varke

बॉबी देओल स्टारर क्राईम ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या 'एक बदनाम आश्रम सीझन ३ पार्ट २' चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीझ 27 फेब्रुवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Advertisement

Prayagraj Mahakumbh 2025: महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही; संगमातील Faecal Coliform बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, CPCB अहवालातून समोर आली धक्कादायक बाब

Prashant Joshi

या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्रिवेणी येथील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र संगम आणि त्याच्या आसपासच्या सर्व पाईप्स आणि नाल्यांना टॅप लावण्यात आला आहे आणि शुद्धीकरणानंतरच पाणी सोडले जाते. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सतत देखरेख करत आहे.

Tamil Nadu Horror: पतीला चाकूचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार, बिहार येथील तीन स्थलांतरित कामगारांना अटक

Shreya Varke

ओडिशातील एका २७ वर्षीय महिलेवर तिरुपूर येथे राहणाऱ्या बिहारमधील तीन कामगारांनी तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, तिघांनी प्रथम तिच्या पतीचे हात बांधले आणि एका निर्जन ठिकाणी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एक अल्पवयीन असून 17 वर्षांचा मुलगा आहे.

Free Chhaava Screening For 'Ladki Bahins': लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस मोफत दाखवला जाणार 'छावा' चित्रपट; अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची घोषणा (Video)

Prashant Joshi

सोमवारपासून महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग सुरु झाले असून, ते रविवारपर्यंत चालणार आहे. एका महिलेला एक तिकीट देण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येक महिलेच्या मनात देशप्रेमाची, धर्मप्रेमाची भावना निर्माण होईल, असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीनिमित्त Chhaava स्टार विकी कौशलने रायगड किल्ल्याला दिली भेट, येथे पाहा फोटो

Shreya Varke

अभिनेता विकी कौशल याने 'छावा' या चित्रपटात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आज शिवजयंती आहे. शिवजयंती उत्सव वेगवेगळ्या भागात साजरा केला जातो. याशिवाय, रायगड येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवभक्तांसह अनेक मान्यवर येथे शिवजयंतीमध्ये सहभागी होतात. या खास प्रसंगी रायगडावर छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी अनेक लोक किल्ल्याला भेट देतात.

Advertisement

Pod Car System In Mira-Bhayandar: लवकरच मीरा-भाईंदरमध्ये सुरु होऊ शकते ड्रायव्हरलेस 'पॉड कार' सेवा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik प्रयत्नशील

Prashant Joshi

सरनाईक यांनी ही उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून, भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असेही त्यांनी सांगितले.

Dance Bars In Mumbai: मुंबईमध्ये पुन्हा सुरु होऊ शकतात डान्स बार; महाराष्ट्र सरकार करणार कायद्यात सुधारणा, येत्या अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

अनेक निदर्शने आणि कायदेशीर वादविवादानंतर, राज्य सरकार डान्स बारविरुद्धची बंदी उठवण्यासाठी एक विधेयक तयार करत आहे. महायुती सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा मसुदा विधेयक सादर करण्यात आला होता, परंतु त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्याने तो पुढे ढकलण्यात आला.

Bee Attack in Pune: शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; शिवजयंतीनिमित्त आलेले 10 जण जखमी, 7 वैद्यकीय कर्मचारी आणि वन अधिकाऱ्याचा समावेश

Jyoti Kadam

पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या टोळीने हल्ला केला आहे. 10 जणांवर मधमाश्यांच्या झुंडीने हल्ला केला. त्यात कर्तव्यावर असलेले सात वैद्यकीय कर्मचारी, वन अधिकारी आणि तीन पर्यटक जखमी झाले.

Maha Kumbh 2025: रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांनी चोरले चणे, विक्रेत्याला राग अनावर, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असताना अनेक भाविक प्रयागराजला जात आहेत. दरम्यान, रेल्वेतील एक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. ज्यात चना विक्रेत्याला भाविक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या एका गटाकडून एका विक्रेत्याला त्रास दिला जात असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये, ट्रेनमध्ये चना विक्रेता गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते

Advertisement

Kranti Redkar Reaction On Chhaava: छावा पाहिल्यानंतर क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव; इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर

Jyoti Kadam

क्रांतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच, विक्की कौशलवरही क्रांतीनं कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू

Prashant Joshi

फेज 2 अंतर्गत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग अशा नवीन मार्गिकांचा समावेश आहे. अशाप्रकारे पुणे मेट्रो शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून, पर्यावरण संरक्षणात योगदान देऊन, आणि नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

Mahakumbh 2025: कर्मचाऱ्याचा वर्क फ्रॉम महाकुंभमेळा, गर्दीत शांतपणे लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल

Shreya Varke

घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लवचिकता असते. घरून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक माणूस महाकुंभ मेळ्यात त्याच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो महाकुंभमेळ्यातून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. "जेव्हा तुम्हाला एकाच वेळी मोक्ष आणि पगार दोन्ही हवे असतात", असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

Delhi CM Swearing Ceremony: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते केशव प्रसाद मौर्य; दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीत 10 राज्यांचे उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Jyoti Kadam

20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात 10 राज्यांचे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाहुण्यांची संपूर्ण यादी पहा.

Advertisement

Lawyer Dies of Heart Attack While Arguing: तेलंगणा उच्च न्यायालयात घडली दुःखद घटना, खटल्याचा युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shreya Varke

तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले.

NASA Layoffs: अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये कामगार कपात; 10% कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Jyoti Kadam

अमेरिकन अंतराळ संस्था नासामधील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

West Bengal: अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील 6 दोषींना मृत्युदंडाची शिक्षा

Shreya Varke

पश्चिम बंगालम येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या सहा महिन्यांत सहा दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेच्या सातपैकी सहा प्रकरणांना मुलींवर बलात्कार आणि हत्येचे 'दुर्मिळ' प्रकरण म्हणून वर्गीकृत करण्यात आले. यामध्ये, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि नंतर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुलगा Jay Shah असल्याचे भासवून आमदाराकडून 5 लाखांची मागणी, 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

Shreya Varke

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा असल्याचे भासवून हरिद्वारमधील राणीपूर येथील भाजप आमदार आदेश चौहान यांच्याकडे एका तरुणाने फोनवरून पाच लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, चौहान यांना फोन करणाऱ्याने आक्षेपार्ह भाषेत उत्तर दिले आणि पैसे देण्यास नकार दिल्यास सोशल मीडियावर प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली.

Advertisement
Advertisement