Kranti Redkar Reaction On Chhaava: छावा पाहिल्यानंतर क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव; इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर
क्रांतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच, विक्की कौशलवरही क्रांतीनं कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Kranti Redkar Reaction On Chhaava Movie: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये क्रांती रेडकरनं विक्की कौशल अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओमध्ये बोलताना क्रांतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच, विक्की कौशलवरही (Vicky Kaushal) क्रांतीनं कौतुकाचा वर्षाव केला आहे. विक्की कौशलने जे काम केलं आहे, ते इतकं स्तुत्य आहे... ते बघताना आपल्या अंगावर शहारा येतो, असं क्रांती व्हिडीओ शेअर करत म्हणाली आहे. ('किल्ले रायगडावर जातोय', Shiv Jayanti निमित्त Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”)
क्रांती रेडकरनं इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते की, "माझे डोळे आताही सुजलेले दिसतायत. मी काल 'छावा' हा चित्रपट बघून आलीये. हा चित्रपट समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणीव करून देतो की, तुम्ही समाजात कुठे उभे राहत आहात? माझी अशी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे की, तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल, हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. हा एक खूप वेगळा अनुभव आहे."
क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
दरम्यान, 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्यानं देशभरात धुमाकूळ घातला आहे. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विक्की कौशल झळकला आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका बॉलिवूड स्टार अक्षय खन्नानं साकारली आहे. या चित्रपटानं रिलीज होताच अनेकांचे विक्रम मोडले. 'छावा' 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)